शनिवार, ३० डिसेंबर, २०१७

किन्हीराजा येथून पोलिसांनी गुटख्यासह 45 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त

                          ( संग्रहीत छाया) 

👉 सिंघम किरणकुमार साळवे यांची धडक कार्यवाही

महादेव हरणे किन्हीराजा 

           वाशिम जिल्ह्यात पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी  अवैध धंद्यावर लगाम घातला असून लपून छपून अवैधरित्या धंद्या करू पाहणाऱ्याच्या मुसक्या आवळण्याचे काम त्यांच्या शिलेदारांनी चालविल्याने जऊळका पोलिस स्टेशन येथे सिंघम किरणकुमार साळवे  रुजू होताच अवैद्य धंद्यावर  धाडसत्र चालविल्याने परिसरात दहशीतीचे वातावरण पसरले आहे. किन्हीराजा येथे अवैद्य गुटखा येत असल्याची गुप्त  माहिती मिळताच कर्तव्यदक्ष ठाणेदार किरणकुमार साळवे यांनी  किन्हीराजात सापळा रचला . गावातील सतीश नागरे यांच्या हॉटेल जवळून चोरद येथील विजय नामदेव भोंडणे वय 21 वर्ष याला  मोटारसायकल क्रमाक एम एच 30 एक्यु  गुटख्याची वाहतूक करताना  रंगेहात पकडण्यात आले. त्याच्या जवळून वाह पान मसाला 20 सीलबंद पॅकेट ,विमल पण मसाला 24 नग सीलबंद पॅकेट ,गोवा पान मसाला 45 नग असा एकूण प्रतिबंधित तंबाखू निर्मित गुटखा किंमत 13 हजार 400 रुपये आणि मोटारसायकल 45 हजार 900 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला . आरोपी विरुद्ध कलम 192 सीआरपीसी अन्वये आणि अन्न सुरक्षा व मानके अधिनियम अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पुढील तपास ठाणेदार किरणकुमार साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

महादेव हरणे 
कार्यकारी संपादक  
सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा