मंगरूळपीर-येथील पंचायत समिती सभागृहामध्ये गोदावरी व्हॅली फाॅर्मस प्रोड्युसर कंपनी कळमनूरी व्दारा आयोजीत प्रगतीशिल शेतकर्यांची टोमॅटो लागवडीबाबत प्रगतीशिल शेतकर्यांची कार्यशाळा दि.३१ डिसेंबर रोजी अकरा वाजता सूरूवात झाली.
या कार्यशाळेमध्ये डेप्युटी कलेक्टर संजय काटकर,गोदा फाॅर्मचे डायरेक्टर नितीन चव्हाण,मंगरुळपीर तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे तसेच कृषी अधिकारी शेळके,इंगोले ,डिगांबर गीरी,नवले,आदींची प्रमूख ऊपस्थीती लाभली.मंगरुळपीर तालुक्यातील प्रगतीशिल शेतकरी यांच्याकरीता टोमॅटो लागवडीबाबत सखोल मार्गदर्शन करून प्रोजेक्टरव्दारा आधुनिक पिकपध्दतीवर प्रेंझेनटेशन करुन शेतकर्यांच्या पिक घेतांना येणार्या अडचनी आणी शेतिविषयक बाबीवर चर्चा करन्यात आली.प्रास्ताविक कुलदिप,कार्यक्रमाचे संचलन शेळके तर आभार भगत यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा