200 पेक्षा जास्त शौचालयाचे लक्ष्य असलेल्या
*जिल्ह्यातील 94 ग्रामपंचायतींना रेड अलर्ट*
जि. प. अध्यक्ष आणि सीईओंचा सरपंचांना अल्टीमेट.
वाशिम: दि १८
जिल्हा हागणदारीमुक्त होण्यास अडसर ठरणार्या २४७ ग्रामपंचायतींच्या सरपंचांना जि. प. अध्यक्ष हर्षदा देशमुख आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी पत्र पाठवुन शौचालयाचे बांधकाम पुर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. २०० पेक्षा जास्त शोचालय बांधकामाचे टार्गेट बाकी राहिलेल्या ९४ सरपंचांना लाल सहिचे पत्र पाठवुना कलम ३९ अंतर्गत कारवाई करण्याचा ईशारा देण्यात अाला आहे.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सन २००० पासुन जिल्ह्यातील प्रत्येक घरामध्ये शौचालयाचे बांधकाम करुन त्याचा वापर करण्याचा कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये ९ आॅगस्ट २०१५ पासून संपूर्ण स्वच्छतेची आॅगस्ट क्रांती हे अभियान सुरु करुन स्वच्छ भारत मिशन या कार्यक्रमास गती देण्यात आली. गेल्या दोन वर्षामध्ये जिल्ह्यामध्ये विविध प्रकारचे जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात अाले. यामध्ये महीला मेळावे, गृहभेटी, रॅली, एलईडी व्हॅन, याव्दारे तसेच कलावंतांमार्फत जनजागरण प्रभात फेरया या विविध उपक्रमाधून वैयक्तीक शौचालयाचे बांधकामाची व वापराची आवश्यकता याचे महत्व जनतेला पटवुन देण्यात आलेले आहे. परिणामी जिल्हयामध्ये एकुण २४४ ग्रामपंचायती हागणदारी मुक्त झाल्रूा असुन जिल्ह्यातील वैयक्तीक शौचालयची संख्या ७६ टक्के इतकी झालेली आहे. यामध्ये स्थानिक लोक प्रतिनिधींनी विशेष प्रकारे या कार्यक्रमामध्ये योगदान दिल्यामुळे या गावामध्ये शौचालयाचे मोठ्या प्रमाणावर बांधकामाचे होवुन गाव हागणदारी मुक्त झालेली आहेत किंवा हागणदारी मुक्तीकडे वाटचाल करीत आहेत.
असे असतांना २४७ ग्रा. पं. मध्ये या दोन वर्षामध्ये शौचालयाच्या कामाची प्रगती अतिशय अल्प प्रमाणात झालेली आहे. दोन वर्ष सातत्याने पाठपुरावा करुन ही अजुनही उर्वरीत शौचालयाचे बांधकाम होण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी म्हणजे सरपंच उपसरपंच ,ग्रा.पं.सदस्य, तंटा मुक्ती गाव समितीचे अध्यक्ष, अशा लोकांना बरोबर घेवुन वैयक्तीक शौचालयाच्याा बांधकामासाठी गृहभेटी देवुन ग्रामस्थांना शौचालयाचे बांधकाम करण्यासाठी प्रेरीत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बाकी राहिलेल्या कामाचे दररोजचे, हप्त्याचे व महिन्याचे नियोजन करण्याच्या सुचना दिल्या आहेत. या नियोजनाप्रमाणे काम केल्यास गाव हागणदारीमुक्त होण्याची संभाव्य तारीख सुध्दा सदरच्या पत्रात नमुद करण्यात आली आहे.
मात्र यासाठी गावातील सर्व लोकप्रतिनिधींनी व कर्मचारी यांनी एकत्र येवुन दररोज गृहभेटी देवुन शौचालय नसलेल्या व्यक्तींना शौचालय बांधण्यासाठी प्रवृत्त करुन त्यांच्याकडून शौचालय बांधुन घ्यावे व त्यांना त्याचा वापर करण्याची सवय लावणे गरजेचे असल्याचे पत्रात म्हटले अाहे.
*..तर सरपंचावर कलम ३९ अंतर्गत कारवाई*
--आपणास विनंती की करण्यात येते की, दिलेल्या दिनांकास गाव हागणदारी मुक्त घोषीत करण्याची जबाबदारी आपणास पार पाडावयाची आहे. गाव हागणदारी मुक्त करणे हे स्वच्छ भार मिशन या राष्ट्रीय कार्यक्रमाचा एक भाग असल्यामुहे ग्रामपंचायतीने सदस्य म्हणुन राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये पुढाकार घेवुन काम करणे आपले कर्तव्य आहे. व ग्रामपंचायत अधिनियम १९५८ प्रमाणे आपली जबाबदारी देखील आहे. आम्हाला खात्री आहे की, ग्रामपंचायत अधिनियमनुसार आपणावर नेमुन दिलेल्या दिनांकास आपले गाव हागणदारी मुक्त घोषीत कराल. विभागीय आयुक्त यांनी जिल्हा परिषदेमध्ये घेतलेल्या आढावा बैठकीमध्ये स्वच्छ भारत मिशन अंतर्गत् गाव हागणदारी मुक्त करुन या राष्ट्रीय कार्यक््रमामध्ये दिलेल्या उदिददष्टानुसार काम न करणाºया ग्रामपंचायतीवर कलम ३९खाली कारवाई करण्याचा सुचना देखील दिलेल्या आहेत. त्यामुळे पुढील काळात या कार्यक्रमामध्ये सहभागी हावुन वैधानीक जबाबदारी पार पाडाण्यात कसुर करणाºया ग्रामपंचयतीवर कलम ३९ खाली कारवाई करण्यात येईल याची कृपया नोंद घेण्यात यावी.
सम्राट टाईम्स
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा