मंगळवार, २८ नोव्हेंबर, २०१७

भारतीय संविधान मानवतेला केंद्र बिंदु मानुन तयार करण्यात आले-फुलचंद भगत





मंगरुळपीर-येथील अनू.जाती मुलांची शासकिय निवासी शाळा तुळजापुर या ठिकाणी दि. 26 नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान गौरव दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण सुरजुसे,कोमल मेश्राम,रश्मी निराळे,मंगेश हुड,सुमेध चक्रनारायण मिना भगत आदींची ऊपस्थीती होती.या
कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे फुलचंद भगत यांनी देशात असणाऱ्या सहाच्यावर जाती ह्या केवळ चार टप्यामध्ये भारतीय संविधानात समाविष्ट करण्यात आल्या ,राजा ते रंक समाजाला अधिकार देत असतांना सर्वात मोठी ताकत एक व्यक्ती एक मत एक मूल्य या प्रमाणे अधिकाराचा हक्क देऊन या जगामध्ये भारतीय संविधानाने सर्व श्रेष्ठत्व  मिळवले असल्याचे आपल्या प्रमुख भाषणातुन मत व्यक्त केले.आदित्य गुजरे,ॠतीक वर,राजदिप मनवर,सुमेध कांबळे,प्रशांत इंगळे आदी विद्यार्थ्यांनी भाषणे दिली.राज्यघटनेची ऊद्देशपञीकेच्या वाचनाने कार्यक्रमाची सांगता करन्यात आली. यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रविंद्र चव्हाण हे होते, तर प्रमुख उपस्थिती फुलचंद भगत,संदिप सातपुते,  यांच्यासह विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्टपाल आडोळे, तर सूत्रसंचालन वैभव जामनिक तर आभार सागर भगत यांनी मानले.


    सम्राट टाईम्स लाईव्ह
  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा