मंगळवार, २८ नोव्हेंबर, २०१७

कामरगाव येथे संविधान दिवस विध्यार्थ्यांना संविधान देऊन साजरा


कामरगाव येथे २६ नोव्हेंबर म्हणजेच संविधान दिवस अतिशय थाटात साजरा करण्यात आला. कामरगाव येथील राधाकृष्ण टायपिंग इन्स्टिटयूट येथे श्री. प्रकाश इंगळे पश्चिम विदर्भ प्रदेश अध्यक्ष RPI (डे.) यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना संविधान  देऊन गुणवंत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी राधाकृष्ण टायपिंग इंस्टीट्युटचे संस्थापक श्री. विशाल ठाकरे , श्री. अंकुश ठाकरे , सागर नोकरी मार्गदर्शन केंद्र कामरगाव  संचालक श्री. अंकुश नाईक , यांनी कार्यक्रमाला हजर राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच विद्यार्थ्यांशी हितगुज केले. श्री. प्रकाश इंगळे यांनी संविधान वाचून विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व 
 भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या 
विनोद नंदागवळी 
.९६७३९५४५१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा