शनिवार, १८ नोव्हेंबर, २०१७

मुख्यमंत्री याद राखा नाभीकांच्या वाट्याला जात तर.... नाभिक संघटनेचा तीव्र निषेध



दामोदर जोंधलळेकर

मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाभिक समाजाविषयी दौड येथील जाहीर सभेत  अपशब्द वापरल्याने महाराष्ट्रात त्यांचे तीव्र पडसाद उमटले. नाभिक संघटना रस्त्यावर उतरली. महाराष्ट्रात नाभिक समाजाने आज बंद पुकारला . जागोजागी  मुख्यमंत्र्यांचा निषेध नोंदविण्यात आला. कारंजा येथे नाभिक समाजाने आपली दुकाने  बंद देऊन कडकडीत बंद पाळला.  मुख्यमंत्र्या विरोधात घोषणाबाजी करत  निषेध नोंदवला. निषेध पोस्टरवर  मुख्यमंत्र्याची अर्धी टकली अर्धी मिशी कापण्यात  येऊन मुख्यमंत्री याद राखा नाभिक समाजाच्या वाट्याला जाल तर...असा  गर्भित इशाराही देण्यात आला . नाभिक समाजााविषयी मुख्यमंत्र्यांनी भावना दुखविणारे वक्तव्य केल्याने त्यांनी माफी मागावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नाभिक संघटनेने तहसीलदार यांना  निवेदनातून दिला आहे  

दामोदर जोंधळेकर कारंजा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा