शनिवार, १८ नोव्हेंबर, २०१७

बेलखेड येथे स्व. कॉ. रामेश्वर डोईफोडे स्मृती प्रित्यर्थ जाहीर व्याख्यान


कारंजा तालुक्यातील ग्राम बेलखेड येथे दि. १९/११/२०१७ रोजी सायंकाळी ७. ०० वाजता हनुमान मंदिर पटांगण, बेलखेड येथे  स्व. कॉ रामेश्वर डोईफोडे यांच्या चवथ्या स्मृती प्रित्यर्थ  अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर जाहीर व्याख्यान आहे. ह्या कार्यक्रमाचे प्रबोधनकार शरद वानखडे प्रात्यक्षिकासह  यांच्या तुफानी विनोदी शैलीतून हा कार्यक्रम पार पडणार आहे. त्याचबरोबर गावातील जे युवक व युवती  सैन्य आणि पोलीस दलामध्ये सहभागी होऊन देशसेवा व सुरक्षे संदर्भात काम करण्यास प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांच्या पालकांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम क्रांती रुरल डेव्हलपमेंट असोसिएशन, बेलखेड या सामाजिक संस्थेअंतर्गत स्मृतिचिन्ह देऊन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाकरिता प्रमुख अतिथी म्हणून धनज पोलीस स्टेशन येथील ठाणेदार श्री. मानकर साहेब, जि. प. सदस्य गजानन अमदाबादकर , अ. भा. अनिस,  जिल्हा समन्वयक अंबादास खडसे, अकोला महानगर संघटक  चंद्रकांत झटाले, चेतना अध्यापक विद्यालय वर्धा येथील प्राचार्य मुनेश्वर सर , अंबादास डोईफोडे , जनमाध्यम प्रतिनिधी विनोद नंदागवळी, नेहरू युवा केंद्र समन्वयक आशिष धोंगडे आदि मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न होणार आहे. तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान क्रांती रुरल डेव्हलपमेंट चे संस्थापक अध्यक्ष चंदशेखर डोईफोडे यांनी केले आहे.  
विनोद नंदागवळी ( कामरगाव रिपोर्टर )मो. ९६७३९५४५१६

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा