शनिवार, १८ नोव्हेंबर, २०१७

डोनगांव कडकडीत बंद*


सतीश गाभणे
पिंप्री सरहद्द
दौंड तालुक्यातील भिमा सहकारी साखर कारखान्याच्या सभेमध्ये *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाभिक समाजाच्या भावना दुखावल्या बाबतचे वक्तव्य केल्याची क्लीप महाराष्ट्रभर व्हायरल झाली असून यामध्ये नाभिक समाजाच्या  भावना दुखावल्या गेल्या आहेत त्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटले आहेत. त्यामुळे स्वाभिमानी नाभिक संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने व बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने तसेच  डोनगाव येथील स्थानीक नाभिक संघटनेचे अध्यक्ष विठोबा आनकर, राजु महंकार, भिकाजी आनकर,नामदेव आनकर यांनीआज सलुन दुकाने बंद ठेवून मुख्यमंत्र्यांचा जाहीर निषेध केला आहे
मुख्यमंत्र्यांनी प्रिंट मिडिया व इलेक्ट्रॉनिक मिडिया माध्यमातून महाराष्ट्रातील नाभीक समाजाची जाहीर माफी मागावी अन्यथा नाभिक समाजाच्या वतीने मुख्यमंत्र्यांनवर गुन्हा दाखल करण्यात येईल.असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
सतीश गाभने
9511420333

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा