शनिवार, १८ नोव्हेंबर, २०१७

वाशिमातील अ‍ॅबेकसचे १६ विद्यार्थी राज्यस्तरावर झळकले



 सिया  मुसळे, जयेश मात्रे, रिध्दी  कुटे, सिया डोडवडे, प्रणव शर्मा  ठरले चॅम्पीयन

सम्राट टाइम्स लाईव्ह

वाशिम   :   स्थानिक जवाहर कॉलनीस्थीत ‘वंडर ट्रॅक अ‍ॅकेडमी’ च्या अ‍ॅबेकसचे केंद्रा वरील २० विद्यार्थ्यापैकी सोळा विद्यार्थ्यांंनी आपल्या अलौकिक बुध्दीमतेचा परिचय देऊन जिल्ह्याचे नाव राज्यात झळकविले आहे. 

 ‘वंडर ट्रॅक अ‍ॅेकेडमी’ या संस्थेत अ‍ॅबेकसचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची मुंबई  येथे राज्यस्तरीय परिक्षा घेण्यात आली. त्यात राज्यातील बऱ्याच संस्थेच्या विद्याथ्र्यांनी सहभाग घेतला होता. तसेच वाशिम येथील  शांती निकेतन, हॅपी फेसेस, माऊंट कारमेल, लायन्स विद्यानिकेतन व नारायण किड्स या शाळेतील विद्यार्थीr देखिल सदर परिक्षेसाठी मुंबई येथे जाऊन सहभागी झाले होते.  या परिक्षेत सिया सुभाष मुसळे, जयेश मात्रे, रिध्दी रवी कुटे, सिया डोडवडे, प्रणव शर्मा हे विद्यार्थी चॅम्पीयन ठरले. तर प्रथम क्रमांकावर सानिया पांडे, गायत्री कोराण्णे, प्राणशू सिन्हा, सोहम शर्मा, सोहम इंगोले तसेच व्दितीय क्रमांकावर अंजली वाडजे, आचल इंगोले, हर्ष तायडे आणि तिसNया क्रमांकावर यश बेंद्रे, श्रीपाद राऊत तसेच सुनिती अवगले यांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली. संस्थेच्या संचालिका प्रा.सौ.अंजली इन्नाणी व मनोज इन्नाणी यांच्या मार्गदर्शनाखाली २० विद्याथ्र्यांनी भाग घेतला होता. या अ‍ॅबेकसच्या नियमीत सरावाने मोठ मोठ्या संख्येची आकडेमोड विंâवा इतर गणितं चिमुकल्या मुलांना सहज साधता येतात. 

या सरावामुळे मुलांचा आत्मविश्वास, एकात्मता आणि अचुक गणित करण्याची क्षमता तसेच दैनंदिन कार्यातही उल्लेखनिय प्रगती वाढल्याचे दिसून येते. या विद्याथ्र्यांची चेन्नई येथे राष्ट्रीय स्तरावर परिक्षेकरिता निवड करण्यात आली असून त्यांनी चेन्नई येथे यश प्राप्त केल्यास या विद्याथ्र्यांची मलेशिया येथे होणाNया आंतरराष्ट्रीय परिक्षेकरिता संस्थेच्यावतीने निवड करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या संचालिका सौ. अंजली  इन्नाणी यांनी  दिली.
सम्राट टाइम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा