सोमवार, २७ नोव्हेंबर, २०१७

पिंप्री ची शाळा झाली चकाचक


सम्राटचा दणका
प्रभाकर नाईकवाडे 

रिसोड तालुक्यातील पिप्रि सरहद येथील जिल्हा परिषद शाळा घाणीच्या विळख्यात हे वृत्त सम्राट टाइम्स पोर्टल चॅनल ला प्रकाशित होताच शिक्षण विभागाचे धाबे  दणाणले शिक्षण विभागाने वृत्ताची दखल घेऊन शाळेची घाणीतून मुक्तता केली शाळा चकाचक करण्यात आली 
पिंप्री येथील जिल्हा परिषद शाळेत 1 ते 7वर्ग आहे  शाळेत घाणीचे साम्राज्य निर्माण झाले  सर्वत्र दुर्गंध पसरला विद्यार्थ्याना शिक्षण घेणेही कठीण झाले शौचालयात घाणच साचली स्वयंपाकगृह घाणीच्या विळख्यात सापडले शालेय पोषण आहार घाणीत शिजविले जात असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला या बाबतचे वृत्त सम्राट टाइम्स मध्ये प्रकाशित होताच शिक्षण विभाग खडबळूून जागा झाला शिक्षकांनी लगेच शौचालय आणि स्वयंपाकगृहातील घाण साफ करून चकाचक केले सम्राट टाइम्स ने न्याय मिळवून दिल्याने गावकऱ्यांनी सम्राट टाइम्स चे आभार मानले 

प्रभाकर नाईकवाडे पिंप्री सरहद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा