सोमवार, २७ नोव्हेंबर, २०१७

महात्मा फुले स्मृती दिन शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात यावा. - भागवत मापारी.


गोरख बोरकर

28 नोव्हेंबर हा दिवस महात्मा जोतिराव फुले स्मृती दिन...शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात यावा....याकरिता मा. जिल्हाधिकारी साहेब जिल्हा वाशीम मार्फत मा. मुख्यमंत्री साहेब,महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई यांना निवेदन पाठविले आहे. 
      शासनाने या निवेदनाची दखल घेवून येणाऱ्या काळात महात्मा जोतिराव फुले स्मृती दिन शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात यावा अशी मागणी वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेने केली आहे. अशा पध्दतीने आमची मागणी पूर्ण केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेने दिला आहे.
     यावेळी निवेदनावर वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत मापारी तसेच आकाश शिंदे, चेतन सरकटे व कुणाल गोटे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
गोरख बोरकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा