सोमवार, २ ऑक्टोबर, २०१७

नवी दिल्ली येथे घरेलु हिंसाचार परिषदेस स्वामी विवेकानंद संस्थेचा सहभाग


वाशीम : राष्ट्रीय जनसहयोग एवं बालविकास संस्थान भारत सरकारच्या वतीने नवी दिल्ली येथील हौज खास परिसरात मागील महिन्यात घेण्यात आलेल्या घरेलु हिंसाचार व महिला सुरक्षा अधिनियम 2005 या विषयावरील परिषदेत जिल्हयातून शिरपूर जैन येथील स्वामी विवेकानंद बहूउद्देशिय संस्थेने सहभाग घेवून लाभ घेतला. या परिषदेसाठी महाराष्ट्रातुन चार सेवाभावी संस्थांची निवड करण्यात आली होती. संस्थेच्या वतीने अध्यक्ष अमोल देशपांडे यांनी या परिषदेत सहभाग घेतला.
    कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रीय जनसहयोग व बालविकास संस्थानचे संचालक एम.ए. इमाम, डॉ. पलानी कृष्णामुथ्थू, श्रीमती वंदना थापर यांनी केले. या परिषदेत पीडब्ल्युपीसी अ‍ॅक्ट 2005, पिनलकोड, घरेलू हिंसा व त्यावरील स्वयंसेवी संस्थेची भूमिका, जिल्हा, तालुका महिला संरक्षण अधिकारी पोलीस अधिकारी यांची भूमिका यावर अ‍ॅड. सौम्या भाऊनिक यांनी मार्गदर्शन केले. डॉ. संघमित्रा भारीक, पोलीस विभागाचे एस.एम. श्रीवास्तव यांनी पोलीस विभाग व एनजीओ यांच्या एकत्रीकरणातून चांगले कार्य करुन शासनास सहकार्य करावे असे सांगीतले. तसेच हिंसाचार पिडीत महिलांची मुले, मुली यांना संरक्षण व कायदे याविषयी सुनिता माथूर यांनी मार्गदर्शन केले. प्रेमा पांडे यांनी दोन्ही दिवस एनजीओ व शासन, पोलीस विभाग याविषयी माहिती दिली. या परिषदेला देशातील अंदाजे दहा राज्यातून विविध संस्थांचे 37 प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये अमोल देशपांडे यांनी जिल्हयाचे प्रतिनिधीत्व केले.

सम्राट टाइम्स न्यूज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा