सोमवार, २ ऑक्टोबर, २०१७

जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा गांधी, लाल बहाद्दूर शास्त्री यांना अभिवादन



सम्राट टाइम्स  न्यूज

महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे व रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे यांच्या हस्ते महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी सागर हवालदार, जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक तथा तहसीलदार आनंद देऊळगावकर, महसूलच्या तहसीलदार श्रीमती शीतल वाणी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बाळासाहेब बोराडे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सम्राट टाइम्स न्यूज

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा