सोमवार, २ ऑक्टोबर, २०१७

मानोरा तालुक्यातील दापुरा येथील अंगणवाडीची इमारत शिकस्त!




मानोरा:-महाराष्ट्र मानव विकास मिशन अंतर्गत सण २००९ मध्ये वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील दापुरा या ठिकानी अंगणवाडी क्रमांक २ ची इमारत उभारण्यात आली व त्या नन्तर एक ते दीड वर्षाच्या कालावधीत इमारतीच्या छतामधून पाणी गळायला लागले.सदर इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे आहे.सदर इमारतीचे बांधकाम झाल्यानंतर सबंधितांनी या इमारतीकडे पाठ फिरवली.त्यामुळे आज रोजी ही इमारत चिमुकल्यासाठी धोकादायक ठरत आहे.कारण इमारत कधी कोसळेल याचा नेम नाही.
     या बाबत सविस्तर असे की,महाराष्ट्र मानव विकास मिशन अंतर्गत सन २००९ ला दापुरा येथे अंगणवाडी क्रमांक २ ची इमारत उभारण्यात आली.परंतु इमारतीची बांधणी ही निकृष्ट दर्जाची झाल्याने अवघ्या एक ते दीड वर्षात छतावरून पाणी गळायला लागले त्यांनतर बांधकाम करताना पुरेसे सिमेंट वापरण्यात न आल्याने अंगणवाडी खोल्याच्या फर्सया उकडत आहे.या इमारतीला लावण्यात आलेल्या खिडक्या सुदधा सुस्थितीत नाहीत आणि मुलांना चढ उतार करण्यासाठी असलेल्या पायऱ्या तुटलेल्या आहेत.या अंगणवाडी मध्ये कुपटा एकची अंगणवाडी सेविका अहवाल मिटिंग होते. या वेळी या ठिकानी मिटींगला येणाऱ्या सेविकांसाठी स्वछतागृह नसल्याने त्यांची कुचंबना होते.या ठिकाणी स्वछतागृह आहे परंतु त्याचा दरवाजा तुटलेला असल्याने तो लागत नाही.इमारत शिकस्त असल्याने अनेक पालकांनी आपल्या बालकांना अंगणवाडी मध्ये पाठविणे बंद केले आहे.कारण या ठिकाणी मुलांना पाठविले तर ते परत येतील की नाही अशी भीती पालकांच्या मनात आहे.शिकस्त इमारतीमुळे लहान बालकांचे जीव धोक्यात आहे.त्या मुळे संबंधितांनी या इमारतीची दुरुस्ती करावी किंवा नवीन इमारत उभारावी अशी मागणी अंगणवाडी सेविका मदतनीस व पालकांकडून होत आहे.या बाबत आमचे प्रतिनिधी धनंजय राठोड यांनी येथील ग्रामसेवक यांची भेट घेऊन विचारणा केली असता लवकरच दुरुस्ती अथवा नवीन इमारत बांधनार असल्याचे ग्रामसेवक करसडे यांनी सांगितले.

 धनंजय राठोड मानोरा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा