सोमवार, २ ऑक्टोबर, २०१७

माहूर गडावर सिमोलंघनाने नवरात्र महोत्सवाची यशस्वी सांगता.


माहूर (प्रतिनिधी राजु दराडे) महाराष्ट्राची कूलस्वामिनी म्हणून सर्वदूर ख्याती प्राप्त  रेणुका गडावर प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी वरदाई पहाड़ावर सिमोलंघन करून नवरात्र महोत्सवाची यशस्वी सांगता झाली.
            परंपरे प्रमाणे भगवान परशुराम यांची पालखी  छत्र, चामर इत्यादिच्या सजावटीने सुशोभित करून   सनई,चौघडा,संभळ,टाळ,मृदंग,झांज इत्यादि पारंपारिक वाद्यांच्या मंजुळ निनादात  भट,भोपी, विश्वस्त व भाविक    सिमोलंघनाला निघाले. वरदाई देवीची पूजा,अर्चना करून सिमोलंघन केले.छबीना पालखी गडाला प्रदक्षिणा करून रेणुकामातेच्या मंदिरात आली.भाविकांनी रेणुकादेवी व परिवार देवतेला सोनेरूपी आपट्याची पाने वाहून मनोभावे नमन केले आणि परस्परांना सोने दिले.

           नवरात्र काळात नऊ दिवस श्री रेणूकामातेला अलंकार महापूजा,अभिषेक,परिसर देवता पूजन, छबिना ईत्यादि धार्मिक विधी  करण्यात आला.तसेच या कालावधीत  विविध कलाकारांनी आपल्या कलेचे सादरीकरण करून मातेचरणी आपली सेवा अर्पण केली,त्यात  ललिपंचमीला  ख्यातनाम गायक पं.श्रीधर फडके,पं.वसंतराव शिरभाते,प्रसन्न जोशी  यांचा समावेश होता. अष्टमीचे दिवशी सायंकाळी अध्यक्ष सुधीर  कुळकर्णी,
 पूजारी भवानीदास भोपी,प्रशांत भोपी  यांच्या हस्ते होम हवन विधी पार पडला.नवमीचे दिवशी  सायंकाळी पूजारी विनायक फांदाडे ,चंद्रकांत भोपी यांच्या हस्ते पूर्णाहूती देण्यात आली. .या नवरात्र काळात संस्थानचे वतीने गेल्या वर्षापासून परशूराम मंदीर प्रांगणात  भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था केली होती.नवरात्र काळात   बहुतेक भाविकांना उपवास असल्याने त्यांचे साठी साबूदाना खिचडी व फलाहाराच्या  व्यवस्थेचा समावेश  होता. महाप्रसाद व  शुध्द पिण्याच्या  पाण्याचा  लाभ सुमारे तिन लाख भाविकांनी घेतल्याचा अंदाज यात्रा नियोजनाचा दांडगा  अनुभव असलेल्या  जाणकारांनी वर्तविला आहे. या महाप्रसादाची उत्कृष्ट  व्यवस्था बक्षीस  प्राप्त  कर्मचारी चौधरी यांनी व्यवस्थित  सांभाळली.जिल्हाधिकारी अरुण डोंगरे,संस्थानचे अध्यक्ष न्यायमूर्ती सुधीर कुळकर्णी,जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना,अप्पर पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांचे मार्गदर्शनात संस्थानचे उपाध्यक्ष तथा उपविभागीय पोलीस अधिकारी असाराम जहारवाल,सचिव तथा उपविभागीय अधिकारी नरेंद्र देशमुख,कोषाध्यक्ष तथा तहसीलदार सिद्धेश्वर वरणगांवकर,पो.नि.अभिमन्यु साळुंखे,स.पो.नि.शिवप्रकाश मुळे व सहकारी,विश्वस्त  चंद्रकांत भोपी,संजय कान्नव,आशीष जोशी,विनायक फांदाडे,भवानीदास भोपी,समीर भोपी,श्रीपाद भोपी,सुरक्षा अधिकारी प्रकाश सरोदे,कार्यालयीन कर्मचारी व  यात्रेशी निगडीत सर्व अधिकारी, कर्मचा-यांचे यशस्वी नियोजना मुळेच भाविकांना  मातेचे आल्हादायक दर्शन घेता आल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा