सोमवार, २ ऑक्टोबर, २०१७

सुंभा येथे विज पडून सहा शेळा ठार तर दोन जखमी



*शेळ्या राखत असलेल्या मुलालाही झाली इजा*



सुंभा येथील शिवारात विज पडून सहा शेळा ठार तर दोन जखमी होऊन शेळ्या राखत आसलेल्या मुलाला जखम झाली आहे मुलाचे नाव अंबादास अभिमान्यू कोरे वय १८ वर्षे असे आहे सदर घटना ता २(सोमवारी)चार वाजण्याच्या सुमारास घडली या घटनेचा पंचनामा मंडळ अधिकारी व तलाठी यांनी करून सहा शेळ्यांचे पोस्टमार्टम तेर येथील डाँ कळसाईन यांनी केले चार वाजण्याच्या सुमारास स्वताच्या शेतात  आंबादास हा  शेळ्या राखत होता  आचानक पावसाला सुरवात होऊन विजांचा कडकडाटासह पाऊस सुरू झाला दरम्यान शेळ्यावर विज पडून सहा शेळ्या जागीच मयत झाल्या व दोन शेळ्या गंभीर भाजल्या आहेत व जवळच आंबांदास होता त्यालाही इजा झाल्यामुळे त्याला रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्याच्या नातेवाकांनी  कोंड येथील सरकारी दवाखान्यात दाखल करुन उपचार केले सदर घटनेमुळे कोरे कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आली आहे कोरे यांना थोडीफार शेती आसल्यामुळे त्यांच्यावर नैसर्गिक आपत्तीचा डोंगर कोसळला आहे त्यांना शासकिय मदत मिळण्याची मागणी केली जात आहे


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा