मंगळवार, २६ सप्टेंबर, २०१७

पंडीत उपाध्याय जन्मशताब्दी निमित्त रिसोड येथे स्वच्छता अभियान


विनोद तायडे वाशीम
                      पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या जन्मशताब्दी निमित्त भारतीय जनता पार्टी रिसोड तालुक्याच्या वतीने स्वच्छता अभियान प्रमुख किसनराव माळेकर यांच्या आयोजनातुन 25 सप्टेंबर रोजी शहरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
    पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या 25 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर पर्यत भाजपाच्या वतीने शहरात विविध कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. या कार्यक्रमांतर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी शहरातील बसस्थानक परिसर, ग्रामीण रुग्णालय परिसर आदी अनेक ठिकाणे झाडून स्वच्छ करण्यात आली. यावेळी बोलतांना किसनराव माळेकर म्हणाले की, पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या 25 सप्टेंबर जन्मशताब्दी निमित्त सरकारने अनेक योजना राबविल्या आहेत. सर्वाच्या कल्याणाच्या या योजनांमुळे गोरगरीबांना लाभ होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्वच्छता अभियान सर्वत्र राबविण्यात येत असून या अभियानामुळे जनतेला स्वच्छतेचे महत्व पटत आहे. या स्वच्छता अभियानामध्ये भाजपा जिल्हा उपाध्यक्ष लखनसिंह ठाकुर, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील, तालुका अध्यक्ष प्रशांत देशमुख, प्रदेश सदस्य अशोकराव सानप, बबनराव मोरे, सुनिल बेलोकार, अमोल लोथे, नामदेवराव हुंबाड, अरविंद मोरे, कैलास महाजन, सुनिल लाटे, नारायण सानप, नंदु धांडे, आदींसह भाजपाचे तालुक्यातील अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे आयोजन स्वच्छता अभियान प्रमुख किसनराव माळेकर यांनी केले

विनोद तायडे वाशिम
8888277765

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा