मंगळवार, २६ सप्टेंबर, २०१७

जन्मल्यानंतर फक्त सहा मिनिटात आधार भावनाने बनविले नवीन भारतीय रेकॉर्ड



   हुकमत मुलाणी,
  उस्मानाबाद


तिचा जन्म होऊन अवघे ६ मिनिट झाले असले तरी तिच्याकडे स्वतःची आधार कार्डच्या माध्यमातून ओळख आहे . उस्मानाबाद जिल्ह्यातील स्त्री रुग्नालयात जन्मलेल्या भावना संतोष जाधव हिला जन्म झाल्यानंतर अवघ्या ६ मिनिटात आधार कार्ड मिळाले असून तिने भारतात नवीन रेकॉर्ड बनवले आहे . जन्मल्यानंतर सर्वात कमी वेळेत तिला आधार कार्डच्या रूपाने भारतीय नागरिक असल्याची ओळख मिळाली आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया या कार्यक्रमा अंतर्गत जन्मलेल्या बाळांना तात्काळ आधार देण्याची योजना सुरू केल्याने हे शक्य झाले आहे .  


यापूर्वी मध्यप्रदेश राज्यातील झाबुवा येथील राखी या मुलीला जन्म झाल्यानंतर २२ मिनिटात आधार मिळाले होते मात्र हे रेकॉर्ड उस्मानाबाद स्त्री रुग्णालयात जन्म घेतलेल्या भावनाने मोडले आहे . उस्मानाबाद स्त्री रुग्णालयातील सर्जन , स्त्रीरोग , बालरोग डॉक्टर यांनी वेळेचे योग्य प्रकारे नियोजन करून आधार व जन्म दाखला दिला आहे यासाठी सर्व डॉक्टरांची टीम तत्परतेने हजर होती .


उस्मानाबाद स्त्री रुग्णालयात सुरेखा व संतोष जाधव या दाम्पत्याची मुलगी भावना हिचा २४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजून ३ मिनिटांनी जन्म झाल्यावर बालरोग तज्ञ् डॉक्टरांनी तिच्यवर उपचार केले व तिची तब्येत ठीक असल्याचे स्पष्ट झाल्यावर तिची १२ वाजून ९ मिनिटांनी आधार नोंदणी मशीनवर फोटो काढून नोंदणी केली व अवघ्या ६ मिनिटात आधार क्रमांक देण्याचे भारतातील एक नवीन रेकॉर्ड स्थापित केले .


उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे , जिल्हा शल्य चिकित्सक एकनाथ मले यांच्या हस्ते आधार व जन्म दाखला मुलीच्या पालकांना देण्यात आला यानंतर स्त्री रुग्णालयात असलेल्या भावनाच्या जन्माचे स्वागत जन्मोत्सव या कार्यक्रमात करण्यात आले . हे रेकॉर्ड बनवण्यासाठी डॉ चंचल बोडके , डॉ राहुल वाघमारे , डॉ रेखा टिके , डॉ पंकज पाटील , डॉ सतीश आदटराव , डॉ सुधीर सोनटक्के , डॉ श्रीकांत मिनीयार या डॉक्टरांची टीम कार्यरत होती तर सहायक अधिसेवीका मंदाकिनी शिंदे यांच्यासह कर्मचारी होते .


भावनाला जन्मल्यावर आधार व जन्माचा दाखल मिळाला असून गेल्या १ वर्षांपासून उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात जन्मतः आधार व लहान बालकांचा जन्मोत्स्व हे उपक्रम राबविले जातात त्यातून १३०० बालकांना आधार क्रमांक मिळाला आहे . डिजिटल इंडिया मोहिमेला उस्मानाबाद जिल्ह्यात गती मिळाली आहे .


आज देशात सर्व गोष्टीसाठी आधार नंबर सक्तीचा करण्यात आल्याने जन्मतः नोंदणी केल्याची प्रतिक्रिया भावनाच्या पालकांनी दिली . विशेष म्हणजे भावनाचा मोठा भाऊ पार्थ याला वयाच्या १ वर्षाच्या आत आधार मिळले होते आता संपूर्ण कुटुंबाकडे आधार आहे .

हुकमत मुलाणी,उस्मानाबाद
मो-8379832200

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा