विनोद तायडे
वाशिम
आदिवासी समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन अनेक योजना राबवित आहे. मात्र आदिवासी मुला मुलींसाठी वसतिगृहाची व्यवस्था नसल्याने विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनेक मागण्यार्थ आमरण उपोषण सुरूवात केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे . आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची सोय होण्यासाठी शासनाने वसतिगृहाची योजना सुरू केली आहे मात्र वस्तिगृहासाठी शासकीय इमारत नाही इमारत बांधून देण्यात यावी या प्रमुख मागणीसह आदिवासी शिष्यवृत्ती तात्काळ देण्यात यावी , डी डी टि वाढवून दहा हजार रुपये करण्यात यावी ,शैक्षणिक साहित्याचा योग्य पुरवठा करण्यात यावा,दीनदयाल योजनेची थकीत रक्कम देण्यात यावी वस्तीगृहाचा कोटा वाढविण्यात यावा,उर्वरित विद्यार्थ्यांना वस्तीगृहात प्रवेश द्यावा आदी मागण्यार्थ 18 विद्यार्थ्यांनी आमरण उपोषण तर 200 विद्यार्थ्यांनी साखळी उपोषणास जिल्हाधिकारी कार्यालया समोर सुरुवात केली आहे
विनोद तायडे वाशिम
8888277765
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा