मंगळवार, २६ सप्टेंबर, २०१७

शनि व गणपती मंदिरासमोर मुंगळा ग्रापंने सोडले घाण पाणी




मालेगाव तालुक्याती मुंगळा येथे ग्रामपंचायतला लागुनच न्यायाची देवता शनिदेव व विद्येची देवता गणपतीचे मंदिरे आहेत. या दोन्ही देवतांच्या मंदिरात दर्शनासाठी
 सकाळी व संध्याकाळी शेकडो भावीक जातात. मात्र, ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील घाण पाणी नालीद्वारे नेमके न्यायाची देवता शनिदेव व विद्येची देवता गणपतीच मंदिरासमोरच आणुन सोडल्यामुळे दर्शनासाठी येणार्या भाविकांना चिखलात उभे राहुन दर्शन घ्यावे लागत असल्यामुळे भावीक भक्त ग्रामपंचायत प्रशनाच्या या प्रकाराबद्दल तिव्र संताप व्यक्त होत आहे.
मुंगळा येथील ग्रामपंचायतला लागुनच वार्ड क्र चार मध्ये न्यायाची देवता शनिदेव व विद्येची देवता गणपतीचे मंदिरे आहेत. गावातील नाल्याचा उपसा न केल्यामुळे घाण पाणी रस्त्यावर साचत असल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली असुन,नागरीकांना विविध आजार उदभवण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच गावातील घाण पाणी गावाबाहेर काढण्याऐवजी नेमके घाण पाणी न्यायाची देवता शनिदेव व विद्येची देवता गणपतीच्या मंदीरासमोर वहीवाट काढुन दिली. मात्र, या मंदीरासमोरील घाण पाण्याला पुढे जाण्यासाठी वाट काढली नसल्यामुळे सदर घाण पाणी मंदीरासमोरच साचुन तेथेच मुरत आहे. त्यामुळे या ठिकाणी चिखल झाला असुन घाण दुर्गंध येत आहे.
गावातील भावीक भक्त दररोज सकाळी न्यायाची देवता शनिदेव व विद्येची देवता गणपतीच्या दर्शनासाठी जातात. मात्र, मंदीरासमोर साचलेल्या घाणपाण्यातुन रस्ता काढुन नागरीकांना दर्शनासाठी जावे लागत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने या दोन्ही देवतांच्या मंदिरासमोरील पाण्याचा निचरा करण्यासाठी बंद झालेल्या नाल्या कार्यान्वीत करून पाण्याचा निचरा करावा.
मालेगाव तालुक्यातील मुंगळा हे ऑरेज व्हिलेज म्हणुन वाशीम जिल्हात नावलौकीक आहे. मालेगाव तालुक्यात मेडशी सर्कल मध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे करण्यात आली. मेडशी सर्कलचे जिल्हा परीषदचे सदस्यांनी मुंगळा गावाला झुकते माप देवुन कामे जास्त प्रमाणात केली. मात्र, मोठ्या प्रमाणात विकासकामे करत असतांना गावातील समस्येकडे सुध्दा लक्ष देण्याची गरज होती. मुंगळा गावात घाण पाणी वाहुन नेण्यासाठी नाल्याच नसल्याचे चित्र पाहावयास मिळते. घाण पाणी वाहुन नेणार्या नाल्या पुर्ण गाळाने भरल्या तरी ग्रामपंचायत प्रशासर आंधळ्याचे सोंग घेवुन उघड्या डोळ्याने बघ्याची भुमीका घेत आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील घाण पाणी चक्क न्यायाची देवता शनिदेव व विद्येची देवता गणपतीच्या मंदीरासमोर आणुन सोडल्यामुळे भावीक भक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. ग्रामपंचायत प्रशासनाच्या अशा प्रकारामुळे भावीक भक्तात तिव्र रोष व्यक्त होत आहे.
मंदीरा समोर साचलेल्या घाण पाण्यात डुकरे बसुन धिंगाना घालीत आहे. तसेच साचलेल्या घाण पाण्यामुळे मच्छराची उत्पती वाढली असुन, यामुळे नागरीकांना विविध आजाराची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामपंचायत प्रशासनाने गावातील तसेच मंदीसमोरील घाण पाण्याची लवकरात लवकर व्हेलेवाट लावावा.


नंदकिशोर वनस्कर मुंगळा 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा