स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर हे मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच मालेगाव येथे आले असता त्यांचा कृषी व्यवसायीक संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी शहरातील सर्वच कृषी व्यवसायीक उपस्थित होते.
यावेळी तुपकर यांनी कृषी व्यवसायीकांशी संवाद साधतांना सांगीतले की, केंद्र सरकारने नोटाबंदी करुन काय साध्य केले. नोटाबंदीमुळे व्यवसायावर मोठा परिणाम झाला. तसेच अनेकांना रोजगाराला मुकावे लागले. यावेळी कृषी व्यवसायीकांनी त्यांना येत असलेल्या अडचणी त्यांच्या समोर मांडला. सदर अडचणी सोडविण्याबाबत आपण शेतकरी नेते राजु शेट्टी यांच्या माध्यमातुन शासनास धारेवर धरु, असे आश्वासन दिले.
यावेळी कृषी व्यवसयीक संघटनेचे अध्यक्ष कैलास भांडेकर, उपाध्यक्ष महेश विश्वंबर, हेमंत देशमुख, सचिव सिध्देश्वर वनस्कर, सतिश बाहेती, आनंद बिरला, अशोक नवघरे, विलास मोरे, पंकज अग्रवाल, प्रशांत शिंदे, निलेश घुगे, प्रदीप वाझुळकर, मयुर गट्टाणी आदींची उपस्थिती होती.
नंदकिशोर वनस्कर
मो. 8380908011
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा