मंगळवार, २६ सप्टेंबर, २०१७

ग्राम मुंगळा येथे विद्यार्थ्यांनी दिला स्वच्छतेचा संदेश


स्वच्छतेबाबत जनजागृती रॅलीत सहभागी विद्यार्थ्यी


मालेगाव तालुक्यातील मुंगळा येथे शनिवार 23 सप्टेंबर रोजी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व श्री मोरेश्वर विद्यालय मुंगळा शाळेच्या वतिने गावात जनजागृती रॅली काढुन जनजागृती करण्यात आली.

महात्मा गांधींच्या 150 व्या जयंती दिनी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी राजपथ, नवी दिल्ली येथे 02 ऑक्टोबर 2014 रोजी स्वच्छ भारत अभियानाची सुरूवात कली. स्वच्छ भारत अभियानाला देशव्यापी एका चळवळीचे स्वरुप देण्यात आले. स्वच्छतेच्या या चळवळीचे नेतृत्व करताना जनतेने महात्मा गांधींचे स्वच्छ व निरोगी भारताचे स्वप्न पूर्ण करावे, असे जनतेला आवाहन केले. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींनी स्वत: हाती झाडू घेऊन दिल्लीतील मंदीर मार्ग पोलीस ठाण्याचा परिसर स्वच्छ केला. रस्त्यावर लोकांनी घाण करु नये व इतरांनाही त्यापासून परावृत्त करावे, असे आवाहन त्यांनी केले. जनतेला पंतप्रधानांनी “ ना गंदगी करेंगे, ना करने देंगे” चा मंत्र दिला.

स्वच्छतेसाठीच्या या जनचळवळीमध्ये समाजातील सर्व स्तरातील लोकांचा सहभाग घेतला. या महत्वकांक्षी उपक्रमात मुंगळा येथील शाले विद्यार्थ्यांनी आमच गाव स्वच्छ व सुंदर गाव राहावे यासाठी त्यांनी गावकर्यांना आव्हानात्मक संदेश दिला. प्रत्येकाने आपल्या घरी शौचालय बांधुन त्याचा नियमीत वापर करावा. आपले घर व घरासमोरील परिसर स्वच्छ ठेवावा. असे विविध प्रकारचे संदेश विद्यार्थ्यांनी रॅली मधुन दिले. रॅलीची सुरवात श्री मोरेश्वर विद्यालयातुन करून शिवाजी महाराज समोरून आदीवासी बहुल भागातुन जैन मंदीर मार्गे, ग्रामपंचायत समोरून तेली वेटाळ मार्गे काढण्यात आली होती. या वेळी रॅलीसोबत शाळेचे शिक्षकांची उपस्थिती होती.

नंदकिशोर वनस्कर
मो. 8380908011

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा