मंगळवार, २६ सप्टेंबर, २०१७

पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त भाजपाने राबवले स्वच्छता अभियान





मालेगाव येथे पंडित दीनदयाल यांच्या जयंती निमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्वच्छता अभियान रावबविण्यात आले.

पंडित दीनदयाळ उपाध्याय हे भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव होते. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासह भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत यांचा महत्त्वाचा वाटा होता. भारतीय जनसंघातून पुढे भारतीय जनता पक्षाचा उगम झाला. त्यांच्या जयंती निमीत्त मालेगाव येथे नविन बसस्थानकावर स्वच्छता अभियान राबवण्यात आले. या कार्यक्रमात भाजपाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला असून नवीन बस स्थानकावरील संपूर्ण स्वच्छता करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थतीत जिल्हा स्वच्छता प्रमुख तथा संयोजक किसनराव माळेकर होते. या कार्यक्रमा प्रसंगी त्यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमा प्रसंगी किसनराव माळेकर यांनी स्वच्छता अभियान जिल्हात यशस्वी राबविण्यात येणार आहे. स्वच्छतेसाठीच्या या जनचळवळीमध्ये समाजातील सर्व स्तरातील लोकांचा सहभाग आवश्यक आहे. हे अभियान कोणी एका व्यक्तीने किंवा पक्षाने केल्याने होणार नाही. तर या अभियानात सर्वांचा सहभाग आवश्यक आहे असे प्रतिपादन जिल्हा स्वच्छता प्रमुख किसनराव माळेकर यांनी केले. या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य गोपाल पाटील राऊत यांनीही स्वच्छता यावर मार्गदर्शन केले.

यावेळी पं.स. सभापती सौ. मंगला गवई, मालेगाव नगर पंचायतचे आरोग्य सभापती किशोर महाकाळ, जिल्हा सरचिटणीस संदिप पींपरकर, मेडशी सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य शाम बढे, यूवा मोर्चा शहर अध्यक्ष तेजश आरू, तालुका सरचिटणीस दीपक आसरकर, गोपीचंद गवई, सुभाष देवळे, पंडीत लांडकर, सुनिल काटेकर, सतिष हारणे, राहूल गायकवाड, अतुल सोभागे, जगदीश मानवतकर, सुशिल सोमटकर, रूपेश मुठाळ, मंगेश कोळकर, राम सोनटक्के, वशीम पठाण, विनोद आदमने, लक्ष्मन आदमने, यंका भगत, रमेश भगत, शुभम महाकाळ, पप्पू अंभोरे, लक्ष्मण अहीर सह असंख्य भाजपा तालुका व युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.


नंदकिशोर वनस्कर
मो. 8380908011

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा