सोमवार, २५ सप्टेंबर, २०१७

राजुरी येथे येमाई देवी नवराञोत्सव याञेस प्रारंभ



हुकमत मुलाणी ,उस्मानाबाद


उस्मानाबाद तालुक्यातील राजुरी (ये)येथे नवराञ महोत्सवा निमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी येमाई देवीच्या मंदिरात घटस्थापना करुन मोठ्या उत्साहात याञेला सुरूवात झाली आहे , या ९दिवस चालणाऱ्या याञेस विविध धार्मिक भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन नवराञामुळे मंदिर परिसर भाविकांनी गजबजुन गेले
तालुक्यातील राजुरी (ये)येथील  जागृत  देवस्थान म्हणून श्री येमाई देवीचे मंदीर आसपासच्या परिसरमध्ये प्रसिद्ध आहे ,या नवराञाध्ये येमाअई देवीचे दर्शन घेण्यासाठी आसपासच्या परिसरातील महिला , भाविक,  भक्तगण ,नागरीकांची अलोट गर्दी होते ,
  माहेर गडाच ठान असलेल्या आई येमाई देवीचे मंदीर "राजगोवी" नदीच्या काठी हे मंदीर वसलेले आहे , येमाई देवी राजुरी गावचे ग्रामदैवत आहे , आजही देवीच्या कृपेने गावावर नैसर्गिक आपत्ती येत आहे , असा मानस आहे,  नवसाला पावणारी देवी म्हणून देवीवर लाखो लोकांची श्रद्धा आहे , आज ही गावातील सर्व महिला मंगवार व शुक्रवार करतात ,
             "येमाई देवी मंदिरात नवराञ महोत्सवास दररोज सकाळी आरती होते  , तर दुपारी आराधी  गिंताच्या माध्यमातून श्री येमाई देवीची उपासना केली जाते तर संध्याकाळी छबिना काढण्यात येतो , या ९ दिवसांत दर्शनासाठी मोठी गर्दी होते '  गावापासून आगदी ५०० मीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात " राजगोवी " नदीच्या काठावरती  वसलेले आई येमाई देवीचे मंदीर आहे , येमाई देवीचे चैञ अष्टमीला पालखी काढण्यात येते , या साठी भाविकांची अलोट गर्दी  असते .
               


हुकमत मुलाणी ,उस्मानाबाद

मो 8379832200

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा