सोमवार, २५ सप्टेंबर, २०१७

उस्मानाबाद जिल्ह्यात सततच्या पावसाने पिकांचे नुकसान





हुकमत मुलाणी -उस्मानाबाद


 सध्या तडवळे व परिसरात गेल्या30 दिवसापासून सततच्या पाऊसामुळे 50%आलेली पिके सततच्या पावसाने नासु लागली आहेत
          याबाबत सविस्तर वृत्त असे की यंदा पेरणी चा व मशागतीच्या खर्चाचा ताळमेळ लागत नसून 100%नुकसान झाली असून आता दररोज पाऊस पडत असल्याने पिके नासुन सोयाबीनच्या शेंगांना बुरा येऊन सोयाबीनचे दाणे नासु लागले आहेत या एक दोन दिवसांत पाऊस थांबला तरच काहिनाकाही पदरात पडणार आहे नाहीतर गेल्या महिन्यात पाऊसा अभावी पिके वाळलेली होती अक्षरशः पिकांवर नांगर फिरवायची वेळ आली होती पण पोळा या सनापासून  पाऊसाला सुरवात झाल्याने पुन्हा पिके हिरवी होऊन सियाबिनला बऱ्या पैकी शेंगा लागल्या होत्या त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडावर टवटवी आली होती परंतु गेल्या 30 दिवसापासून सतत पाऊस पडतच राहिल्याने शेतांत कायम वावरावर पाणी उभे राहिल्याने सोयाबीनची अवस्था त्या शेंगांना बुरा लागल्याचे  दिसत असल्याने सियाबीन चे बी काळे पडून सडू लागले आहे व शेताला चिबड लागल्याचे दिसत आहे   या पिकांचे  पंचनामे करावेत अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे                                               की गेल्या 30 दिवसापासून पाऊस थांबायचं नाव घेत नसल्याने तडवळे व परिसरातील जवळपास 80%शेतकऱयांचे सोयाबीनच्या शेताला चिबड लागल्याने  त्याचा काहीही उपयोग होणार नसल्याचे दिसत आहे
   गत वर्षी पेक्षा यावर्षी चांगला पाऊस होईल असा हवामान खात्याने सांगितले होते त्याच भरवशावर मृग नक्षत्रात पाऊसही चांगला पडला त्यामुळे शेतकरी वर्गाने महागाई चे बीबियाणे खरेदी करून पेरणी जोरात केली पेरणी झाल्या नंतर पिके चांगली उगवली नंतर ही एक दोन पाऊस चांगले झाले पिके चांगली दिसायला लागली त्यामुळे बळीराजा ने पिका कडे बघून आंतर मशागत व खुरपणी केली याचा एकरी नांगरून ,पेरणी,डुबणे, खुरपणी असा एकूण नऊ ते दहा हजार खर्च केला व सलग  दीड महिना  कोरडा ठाक गेल्याने व रोज कडक ऊन व जोरात वारे वाहू लागल्याने जमिनितील ओलावा गेला होता व जमिनीला हात हात भेगा पडल्याने सियाबिनला लागलेली फुले गळून गेली व सोयाबीन चे पाने सुकून वाळू लागल्याचे दिसून येत होती  केलाला खर्च व मिळणारे शून्य उत्पन्न दिसत असल्याने शेतकरी वर्गाची पुर्ती झोप उडाली होती ,सलग दीड महिना होत असून आद्यपही पाऊस पडत नसल्याने तूर ,उडीद ,मूग ,साळ ,पिवळी इत्यादी पिके देखील वाळून गेल्याने शेतकऱयांची पुर्ती कंबर मोडली होती   25%उत्पन्न पदरात पडेल नाहीतर वाळत चाललेल्या उभ्या पिकावर कुळव घालून पीक मोडून रब्बी साठी रान तयार करावे की काय अशी वेळ शेतकरी वर्गावर आली होती ,"गल्या महिन्यात पाऊसाअभावी पिके वाया चालली होती अन या महिन्यात पाऊस ज्यादा पडत असल्याने पिके वाया चालली आहेत "पण गेल्या महिना भरापासून सारखा पाऊस पडत असल्याने पिके नासु लागल्याचे दिसत आहे                  शासनाने लवकरात लवकर याची पाहणी करून पंचनामे करावे व योग्य ती मदत मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे


हुकमत मुलाणी 
उस्मानाबाद 
मो-8379832200

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा