सोमवार, २५ सप्टेंबर, २०१७

स्वयंम स्फुतीतुन महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी पुढाकार




मुंबई नागपुर राष्ट्रीय महामार्गाची सध्या दुरावस्था झाली आहे.जागोजागोजागी मोठे खड्डे पडल्याने वाहन धारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.वाहन चालकांना  रस्तावरील खड्डे चुकवण्यासाठी  मोठी कसरत करावी लागत आहे. रस्तावरील खड्डे पाहुन गावकर्यांनिचं श्रमदानातुन  खड्डे बुजवणे सुरू केले आहे 



 मुंबई नागपुर राष्ट्रीय महामार्गावर वाशीम जिल्हाच्या हद्दीवर  वसलेले पिंप्री सरहद्द गाव  सध्या राष्ट्रीय महामार्गावर  बहूतांश ठीकानी खड्डे पडले आहेत.यामुळे चालकांची डोके दुखी वाढली आहे.सध्या पिंप्री सरहद्द येथील सामाजकार्याची आवड असणारे प्रभाकर नाईकवाडे व ग्रामस्थांनी  ईतरांनां होणारा त्रास पाहता , त्रास दुर व्हावा  यासाठी स्वयंस्फुर्तीने पुढाकार घेत रस्तावरील खड्डे बुजवीण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. रस्तावरील खड्डे पाहुन सदर खड्डामध्ये मुरूम भरून खड्डे बुजविण्यात आले.राष्ट्रीय महामार्गावरील पिंप्री सरहद् यथील सामाजीक कार्याची आवड असनारे प्रभाकर नाईकवाडे   यांनी खड्डे बुजवून हा सर्वांसांठी कुतुहालाचा विषय ठरवला  आहे.यांना खड्डे बुजवत्यांना पाहुन त्याचां हा उपक्रम मोबाईलमध्ये कैद  केल्याने यांचा हा स्तुत आणी कौतूकास्पद  उपक्रम दिसुन आला
या स्तुत ऊपक्रमाबद्दल समाजातुन कामाविषयी  चांगलेच कौतुक होत आहे.

महादेव हरणे 
9922224889

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा