सोमवार, २५ सप्टेंबर, २०१७

जेष्ठ वकील अँड नितीन सातपुते यांची सर्वोच्च न्यायालयात विशेष अधिवक्ता पदी नियुक्ती*



*हुकमत मुलाणी,उस्मानाबाद*

मुंबई येथील उच्च न्यायालयात कार्यरत असलेले जेष्ठ वकील अँड नितीन सातपुते यांची सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे विशेष अधिवक्ता आणि विशेष सरकारी वकील अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा यासाठी महाराष्ट्र शासनाकडून नियुक्ती करण्यात आली आहे अँड नितीन सातपुते हे अभिनेता संजय दत्त यास एक वर्ष अगोदर शिक्षेमध्ये सूट का देण्यात आली या मागे कोणाचा हात आहे या विरोधात जनहित याचिका दाखल केली आहे तसेच मंजुळा शेटे या कैदी महिलेचा मृत्यू ला तुरुंग अधिकारी जबाबदार आहेत यासाठी ही त्यांनी जनहित याचिका दाखल केली होती त्याचा परिणाम म्हणून 6 तुरुंग अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने अँड नितीन सातपुते यांची विशेष अधिवक्ता म्हणून नियुक्ती केली आहे  अँड सातपुते यांच्या निवडीचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे


हुकमत मुलाणी,उस्मानाबाद

मो -8379832200

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा