सोमवार, २५ सप्टेंबर, २०१७

श्रमदानातुन ग्रामस्वच्छता


                     

                                                                        महादेव हरणे                                                                    
            मालेगाव -:-आज दि.25 सप्टेबंर 2017 रोजी ग्रा.प.तिवळी आणी उमरदरी येथे नागरिक आणी विदयाथ्र्यानी
पुढाकार घेवुन स्वच्छता हिच सेवा या उपक्रमामधुन हातामध्ये झाडु घेवुन  रस्ते नाल्या गटारे स्वच्छ केल्या.
स्वच्छता हि सेवा या उपक्रमानुसार जिल्हयामध्ये गावागावात विविध उपक्रम राबविले  जात आहेत.या उपक्रमामध्ये गावातील विदयार्थी आणी नागरिक पुढाकार घेत आहेत .
आरोग्य दायी जिवन जगण्यासाठी स्वच्छ परिसराचे महत्व आता नागरिकाना कळत आहे.त्याचाच एक भाग म्हणुन ग्रामपंचायत तिवळी आणी उमरदरी येथिल जिल्हा परिषद शाळेचे विदयार्थी शिक्षक आणी ग्रामस्थानी प्रत्यक्ष हातात झाडु घेवुन कामाला सुरुवात केली आहे.विदयाथ्र्यानी स्वच्छतेची शपथ घेवुन गावातील गल्ली बोळया मधुन स्वच्छते  रॅली काढली स्वच्छतेच्या घोषणा देत कामाला सुरुवात केली.या वेळी तिवळी ग्रामपंचायत चे ग्रामसेवक सोमटकर व आणी उमरदरी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक इढोळे स्वच्छ भारत मिशन चे पुष्पलता अफुणे कर्मचारी उपस्थित होते.

महादेव हरणे
9922224889

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा