विनोद तायडे वाशिम
दि. २४ सप्टें. रोजी ग्राम लाडेगाव कारंजा येथे आयोजीत इचुकाटा हे हास्य कवीसंमेलन नवदुर्गा उत्सव मंडळातर्फे आयोजित करण्यात आले होते.स्वच्छता ही सेवा हे शासनाचा उपक्रम १५ सप्टेंबर ते २ अॉक्टोंबर सुरू आहे.हा धागा पकडून अनेक वऱ्हाडी रचना व गुडमॉर्निंग पथकाचे किस्से यावेळी सांगण्यात आले....
वऱ्हाडी कविता, दररोजच्या आयुष्यातील किस्से, गाणे, हागणदरी मुक्त गाव करा, स्त्रीभृणहत्या करू नका इ. विषयांवरील कवितांनी धमाल उडवून दिली.
मोठ्या प्रमाणात महिलांची व क्रिकेटची मँच असूनही गावातील तरूण मंडळी, ज्येष्ठ मंडळी यांची उपस्थिती लक्षणीय होती.
हास्यकवीसंमेलनात हास्याच्या फवाऱ्यांसोबतच प्रबोधनाचे वारेही वाहिले.
माया जीव तुयावर
हाय जिवाच्या पराळ..!
तुया सुखाच्या नदीले
नाई आडवा पहाळ...!!
अकोला येथील सुप्रसिद्ध कवी अमोल गोंडचवर यांची "कायजाची कोर" ही कविता कार्यक्रम संपल्यानंतरही परत एकदा सादर करण्याची गावकऱ्यांनी मागणी केली.
इचुकाटा कविसंमेलनात वऱ्हाडी कवी अमोल गोंडचवर ; अकोलायांची कायजाची कोर व वरीस हया कविता भाव खाऊन तर हागणदारी कवितैने हास्याचे फवारे उडवले.माधवराव येवदेकर ; कारंजा यांनी स्वच्छता अभियान हे गीत वेगवेगळया पदधतीने सादर केले.म्हैस या खास वऱ्हाडी व ग्रामीण कवितेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले, गजानन शिले ; कारंजा यांनी मुलगी पाहण्याचां कार्यकम सादर करून वातावरण खुसखुशीत केले. संतोष टोपरे ; कारंजा,फेसबुक व बुडीचा इचुकाटा ह्या कविता तरुणासहं सर्वांना आवडल्या वैभव भिवरकर ; कारंजा यांनी *बायकोची आरती* सादर करुन श्रोत्यांना टाळयांचा ठेका घेण्यास भाग पाडले...व अनेक किस्से सादर केले.. कार्यक्रमाचे यशस्वी व खुमासदार निवेदन गोपाल खाडे यांनी केले.बायको,विद्यार्थी,डॉकटर पोलीसांचे विनोदी किस्से व रिमिक्स गाण्यानी ३ तासं रसिक वर्ग खिळवून ठेवला...
इचुकाटा ह्या हास्यप्रबोधन कार्यक्रमाची संकल्पना वैभव भिवरकर यांची असून, कार्यक्रमाचे संयोजन गोपाल खाडे यांचे आहे.या कार्यकमाचे आयोजन नवदुर्गा उत्सव मंडळ लाडेगावच्या
अध्यक्षा बेबीताई रामकृष्ण अवघड,रूपेश नामदेवराव सुरजुसे यांनी केले
विनोद तायडे वाशिम
8888277765
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा