विनोद तायडे वाशिम
वाशीम: कॉंग्रेसच्या कार्यकाळात शेतकऱ्यांना 75 हजार कोटीची कर्जमाफी देण्यात आली. त्यावेळी कॉंग्रेसने कोणत्याही शेतकऱ्याकडून अर्ज भरून घेतले नाही. केवळ शेतकरी निकषावर कर्जमाफी देण्यात आली. भाजपा शासनाने मात्र 34हजार कोटीची कर्जमाफी घोषीत केली असून त्यामध्ये विविध नियमावली लावून शेतकऱ्यांना रांगेत उभे केलेले आहे. भाजपाची कर्जमाफी ही केवळ शेतकऱ्यांची फसवणूक असून या शासनाने शेतकऱ्यांना भिकारी बनविल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
स्थानिक जिल्हा कॉंग्रेस कमेटीच्या कार्यालयात 24 सप्टेंबर रोजी आयोजित सत्कार सोहळ्यात त्यांनी वरील आरोप केला. यावेळी माजी मंत्री अनंतराव देशमुख, जिल्हाध्यक्ष ऍड. दिलीपराव सरनाईक, जि.प. अध्यक्षा हषदाताई देशमुख, गोपाळराव आटोटे गुरूजी, दौलत हिवराळे, माजी आ. किसनराव गवळी, माजी जि.प. अध्यक्ष अरविंद पाटील इंगोले, सौ. ज्योतीताई गणेशपूरे, राजूभाऊ चौधरी, नकुल देशमुख, महिला अध्यक्षा बानूताई चौधरी, सभापती गजानन भोने, किसनराव मस्के, नामदेवराव मापारी, सरकार इंगोले, तालुकाध्यक्ष परसराम भोयर , इफ्तेखार पटेल, गजाननराव लाटे, गजाननराव पाचरणे, रमेश लांडकर, चक्रधर गोटे, सुभाष शिंदे, प्रल्हाद उलेमाले, दिलीप देशमुख, नथ्थुजी कापसे, डॉ. जगदीश घुगे, दिलीप भोजराज, अशोकराव गवळी, राजेश भारती, फारूकभाई, वाय.के. इंगोले, विकास गवळी, बाबूराव शिंदे, सागर गोरे, ऍड. पि.पि. अंभोरे, वसंतराव इरतकर, नगराध्यक्ष यशवंत देशमुख, प्रा. अबरार मिर्झा, उवेद मिर्झा, अर्जुन उदगिरे, जावेद परवेज, राजू घोडीवाले, मिलींद पाकधने, विशाल सोमटकर, सौ. कुसूमताई गोरे, डॉ. अरूण देशमुख, शाम उफाळे, हरिष चौधरी, अभय राठोड, प्रा. दादाराव देशमुख, सौ.रंजना देशमुख, शालीराम राठोड, तात्याराव देशमुख, सौ. नंदाताई गणोदे, प्रा. संतोष डिवटे, किशोर पेंढारकर, निळकंठ कुटे, बाळाअप्पा गोंडाळ, अनिल धुळे, सुनिल मापारी, पंडीतराव सरनाईक, आरिफ खान, विशाल वाघमारे, रूपेश भोसले, वैभव सरनाईक, गोपाल सरनाईक आदिंची उपस्थिती होती. यावेळी माजी मुख्यमंत्री चव्हाण यांचे भव्य स्वागत व सत्कार जिल्हा कॉंग्रेस कमेटीच्यावतीने करण्यात आले. सोबतच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या अमरावती विभागीय अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल निलेश सोमाणी यांचाही सत्कार माजी मुख्यमंत्री चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी चव्हाण यांनी नारायण राणेवर टिका करीत त्यांनी स्वत:चा इतिहास तपासून बघावा. आरोप व प्रत्यारोप करणे ही त्यंाची सवय बनली आहे. कॉंग्रेस पक्षात प्रदेशाध्यक्षांना निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. आता तरी राणे यांनी कुठे तरी स्थिर व्हावे त्यांची महाराष्ट्राला गरज आहे. त्यांना पुढील कार्याकरीता आपल्या शुभेच्छा असल्याचेही त्यांनी सांगीतले. कार्यक्रमाचे संचालन दादाराव देशमुख तर आभार प्रा. अबरार मिर्झा यांनी व्यक्त केले.
विनोद तायडे वाशिम
8888277765
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा