रविवार, २४ सप्टेंबर, २०१७

75व्या वर्षी झाली मनक्याची यशस्वी शस्त्रक्रिया



डॉ. साबू यांच्या प्रयत्नाला मिळाले यश

विनोद तायडे वाशिम

वाशीम: स्थानिक सिव्हील लाईन येथील सेवा निवृत्त शिक्षक बबनराव खंडूजी बेलाकार यांची वयाची 75व्या वर्षी मनक्याची यशस्वी शस्त्रक्रिया साबू हॉस्पीटल येथे करण्यात आली.  गत सात वर्षापासून मनक्याच्या त्रासामुळे गुरूजींचे चालणे फिरणे बंद झाले होते. या सोबतच त्यांना मोठा त्रासही होत होता. अकोला येथे उपचाराकरीता प्रयत्न केले मात्र समाधानकार यश मिळाले नाही. स्थानिक वोरा हॉस्पीटल जवळील साबू हॉस्पीटलचे संचालक डॉ. विवेक साबू यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी 100टक्के विश्वास दिला. त्यामुळे वयाच्या 75व्या वर्षी बेलोकार परिवार यांनी मनक्याची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. तब्बल सात तास ही शस्त्रक्रीया चालली. याकरीता औरंगाबाद येथील प्रसिध्दी तज्ञ डॉ. निलेश भुते, डॉ. विवेक साबू व डॉ. मयुर जाधव यांनी परिश्रम घेतले. सदर शस्त्रक्रियानंतर आज सदर रूग्ण ठणठणीत बरे झाले असून आज ते प्रवास व चालणे, फरणे सुरू असल्याचे बबनराव यांनी सांगीतले. याबाबत बबनराव बेलोकार यांनी सांगीतले की आज वयाच्या 60 वर्षानंतर शस्त्रक्रिया करण्याकरीता परिवार पुढे येत नाही. रूग्णामध्येही भितीचे वातावरण असते सोबतच नागपूर, पुणे, मुंबई यासारख्या ठिकाणी उपचार करण्याची मानसिकताही निर्माण होते. मात्र जर डॉ. विवेक साबूंसारखी मार्गदर्शन करणारे तज्ञ मिळाले तर निश्चितच रूग्णांना दिलासा मिळू शकतो. त्यांची आजारापासून सुटका  होवू शकते. अनेकजण शस्त्रक्रिया न  करता भितीमुळे तेल लावणे व वेगवेगळे पारंपारिक उपचार करतात. त्यामुळे वेळ वाया जातो. जर योग्य वेळी निर्णय घेवून उपचार केले तर आपल्याला त्रासापासून मुक्तता मिळू शकते. मनक्याच्या आजाराने बेजार झालेल्या रू ग्णांनी एकवेळा डॉ. साबू यांच्याशी भेट घेवून मार्गदर्शन घेण्याचा सल्ला बबनराव बेलोकार व त्यांचे सुपूत्र प्रमोद बेलोकार यांनी दिला आहे.

विनोद तायडे वाशिम
8888277765

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा