सोमवार, २५ सप्टेंबर, २०१७

पं श्रीधर फडके यांच्या गायनाने माहुरगडावरील भाविक मंत्रमुग्ध




                 माहूरगडावर भाविकांचीअलोट गर्दी


माहूर (प्रतिनिधी )  रविवारची सुट्टी असल्याने भाविकांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी  रेणुकामाता मंदिरात आज प्रचंड गर्दी केली होती.त्यामुळे यात्रा नियोजनात कार्यरत असलेल्या सर्वच घटकाची आज चांगलीच दमछाक झाली.नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी यात्रा नियोजनाचा आढावा घेतला.तसेच त्यांनी सपत्नीक श्री रेणुकामातेचे दर्शन घेतले त्या प्रसंगी त्यांचे समवेत अप्पर जिल्हाधीकारी संतोष पाटील, तहसीलदार सिद्धेश्वर वरणगांवकर व मंदिराचे सर्वच विश्वस्त उपस्थित होते.
                दि.24 सप्टेंबर रोजी चौथी व पाचवी   माळ व रविवारची सुट्टी त्यामुळे साहजिकच गर्दी होणार हे निश्चित होते.यात्रा नियोजनातिल सर्वच घटक  त्यादृष्टीने दक्ष होते.आज पोलीस प्रशासनावर विशेष ताण होता.अप्पर पोलीस अधीक्षक बारगळ,उपविभागीय पोलीस अधिकारी असाराम जहारवाल, पो.नि.अभिमन्यु साळूखे,सहा.पो.नि.शिवप्रकाश मुळे व रेणुका देवी संनस्तानचे मुख्य सुरखा आधिकारी प्रकाश सरोदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.आज ललित पंचमी असल्याने  प्रसिद्ध गायक श्रीधर फडके यांच्या गायनाचा संस्थान तर्फे गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. नवरात्र उत्सवानिमित्त श्री रेणूकादेवी संस्थानच्या वतीने प्रसिद्ध गायक श्रीधर फडके यांचा सन्मानचिन्ह देवून सत्कार संस्थानचे अध्यक्ष प्रमुख  जिल्हा न्यायाधीश श्री सुधीर कुलकर्णी, यावेळी तहसीदार सिद्धेश्वर वरंणगावकर, विश्वस्त संजय कान्नव,चंद्रकांत भोपी, श्रीपाद भोपी, समीर भोपी,आशिष जोशी उपस्थित होते. मुख्य पुजारी भवानीदास भोपी,किरण भोपी व प्रशांत भोपी यांनी रेणुकामातेला नागवेली महापूजा घातली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा