मंगळवार, २६ सप्टेंबर, २०१७

कसबे तडवळा येथे विभागीय मलखांब स्पर्धा उत्साहात

     उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथे जिल्हा क्रीडा कार्यालय उस्मानाबाद व जयहिंद विद्यालय यांच्या संयुक्त संयुक्त विद्यमाने लातूर विभागीय मल्लखांब व रोप मल्लखांब स्पर्धा घेण्यात आले    सोमवार (२५) रोजी या स्पर्धेचे उद्घाटन प्रशालेचे प्राचार्य एमएम जाधव ,गाव तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष &शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सुनील वळेकर .पांडुरंग भोगले वा गोळेसर यांच्या हस्ते करण्यात आले .या स्पर्धेमध्ये नांदेड लातूर उस्मानाबाद या जिल्ह्यातील जवळपास तब्बल दोनशे खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता .या स्पर्धेमध्ये वय चौदा सतरा व एकोणीस वयोगटाच्या मुला मुलींनी भाग घेतला होता .ही स्पर्धा जयहिंद विद्यालयाच्या मैदानामध्ये आयोजित करण्यात आली होती .या स्पर्धेमध्ये कसबे तडवळे येथील ऐश्वर्या कोष्टी,अभिजित गोरे ,नांदेड सगरोळी येथील सैनिक विद्यालय च्या खेळाडूंनी विविध प्रकारची प्रात्यक्षिके करून दाखविण्यात आली    मल्लखांब स्पर्धेत स्पर्धेत १४.१७ व १९   वयोगटांमध्ये अनुक्रमे लातूर येथील ओम राजेंद्र जाधव, ये मळे अनुरप अंगद ,अभिजित गोरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला तसेच रोप मल्लखांब स्पर्धेत १४,१७व १९ वयोगटांमध्ये अनुक्रमे    वर्मा    हर्षिता कालीचरण ,वैशाली विजय जाधव ,मंजेरी महेश घोडके याने प्रथम क्रमांक पटकविला .

हुकमत मुलाणी ,उस्मानाबाद (प्रतिनीधी)   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा