मंगळवार, १६ जानेवारी, २०१८

कारंजामध्ये एका तरूणाचा जुन्या वादातून खून

कारंजा शहरातील शिवाजी नगर परिसरातील दोन तरूणामध्ये जुन्या वादातुन झालेल्या मारहाणीत एका तरूणाच्या  पोटात चाकूने वार करून ठार केल्याची घटना दि १५ जानेवारी रोजी रात्री ११ वाजताच्या दरम्यान घडली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी रत्नाकर नवले व ठाणेदार घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान कारंजा शहर पोलिसांनी घटनेच्या दुसऱ्या दिवसी आरोपीला अटक करून त्यांच्या विरुद्ध विविध कलमानव्हे गुन्हा दाखल केला. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपी मंगेश गजाजन काळे वय २२ रा . शिवाजीनगर याने  दत्ता वसंतराव सस्ते वय २८ रा . शिवाजीनगर यांच्या सोबत वाद करून लाथा बुक्याने मारहाण करून चाकूने पोटात वार केले . त्यात सचिन सस्ते चा जागीच मूत्यू झाला, अशी फिर्याद मुतकाची आई अजनाबाई वसंतराव सस्ते   यांनी दिली. फिर्यादीवरून कारंजा शहर पोलिसांनी आरोपी मंगेश गजानन काळे याच्या विरुद्ध ३०२ नुसार गुन्हा दाखल केला. घटनेचा पुढील तपास उपविभागीय अधिकारी रत्नाकर नवले व ठाणेदार एम एम बोडखे करीत आहेत. 

सम्राट टाईम्स न्यूज नेटवर्क

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा