उकळी पेन :-
कालगत पूर्णाताई शिवाजीराव शेवारे...
जन्मतारिख..१५ ऑक्टोबर १९४७ पुण्यतिथी...१६जानेवारी २०१७
आई च्या प्रथम पुण्यतिथी स्मरणार्थ उपा.सौ. प्रविंदाताई सुनील माटे ( मुलगी )रा.नागपूर यांच्या कडून जि.प.व.प्राथमिक केंद्र शाळा उकळी पेन ता.जि.वाशिम ला ६ सीलिंग फॅन सप्रेम भेट देण्यात आले
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुरेशभाऊ इंगोले , तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्या प्रबोधिनीविद्यालयाचे प्राचार्य संजय पेशकलवाड , प्रा.संदीप भगत , राजेश लांभाडे ,समाजसेवक जीवन मह्हले , महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका अध्यक्ष मोहन जैताडे , गजानन चव्हाण ,भीमराव भगत , सीताराम पहेलवान , गजानन जैताडे ,केशव खोडके , पांडुरंग माने , दिपक इंगोले , कैलास कुटे , आदि मान्यवरासह शाळेचे मुख्याध्यापक संजय डवरे सर , शिक्षकव्रुंद आयु.दीपक जावळे ,बोरचाटे सर , भोयर सर , बिराजदार सर , हातगुडे सर ,शिक्षिका मनवर मँडम , शेलारे मँडम , लव्हाळे मँडम व पालक वर्ग उपस्थित होता.
सर्वप्रथम संजय डवरे यांनी पूर्णाताई शेवारे यांच्या प्रथम पुण्यतिथि निमित्य सार्वजनिक विनम्र श्रध्दांजली वाहून कार्यक्रमाला सुरुवात केली , त्यानंतर सर्वच उपस्थित मान्यवरानी आपल्या श्रध्दांजली पर भाषांतून सौ.प्रविंदाताई सुनील माटे रा.त्रिमूर्ती नगर नागपूर यांचे आभार मानून समिती अध्यक्ष सुरेशभाऊ इंगोले यांचे सुद्धा विशेष आभार मानले.
कार्यक्रमाची सांगता सर्वच मुलांना आक्रोड वाटून करण्यात आली.
सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क
सुरेशभाऊ इंगोले
8830966982
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा