शुक्रवार, १९ जानेवारी, २०१८

कारंजा नगर पालिकेच्या सभापती व स्थायी समिती ची निवड अविरोध


👉 पालिकेमध्ये भारिप-बहुजन महासंघाचा वरचष्मा 

प्रतिनिधी | कारंजा 
कारंजा नगर पालिकेच्या सभापती व स्थायी समितीच्या निवडणुकीमध्ये भारिप-बहुजन महासंघाचा वरचष्मा राहिला. या निवडणुकीचे पिठासिन अधिकारी म्हणून डॉ.शरद जावळे यांनी कामकाज पाहिले. त्यांना मुख्याधिकारी प्रमोद वानखेडे यांनी सहकार्य केले. विशेष समित्यांमध्ये बांधकाम सभापतीपदी शेख अनिसाबी युनूस, शिक्षण सभापतीपदी फिरोज शेकूवाले, आरोग्य सभापतीपदी चंदन गणराज, नियोजन सभापतीपदी अ.एजाज अ. मन्नान, महिला व बालकल्याण सभापतीपदी रुखसना बी राउफ खान, महिला बालकल्याण उपसभापती अब्दुल फैमीदाबी आरिफ यांची अविरोध निवड करण्यात आली आहे.तसेच स्थायी समिती मध्ये निसार खान नजीर खान , सलीम शे.लालू गारवे, प्रसन्ना पळसकर यांना घेण्यात आले आहे.
विशेष म्हणजे कारंजा पालिकेच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत सर्व सभापती तसेच दोन स्थायी समितीचे सदस्य हे भारिप-बहुजन महासंघाचे झाले.तर केवळ आघाडीचे स्थायी समितीमध्ये एक सदस्य निवडून आले.  सभापती पदाच्या निवडणुकीनंतर नगराध्यक्ष शेषराव ढोके यांनी नवनिर्वाचित सभापतींचा सत्कार केला. तसेच भारिप-बहुजन महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला.
सम्राट टाईम्स न्यूज नेटवर्क 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा