मंगळवार, १६ जानेवारी, २०१८

जागतिक भूगोल दिन साजरा


मालेगांव:जागतिक भूगोल दिनानिमित्त दि.16 जानेवारी रोज मंगळवारला मालेगांव तालुक्यातील ना.ना.मुंदडा विद्यालयात जागतिक भूगोल दिन साजरा करण्यात आला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक श्री वसंत अवचार तर प्रमुख पाहुने पर्यवेक्षक श्री.सुनील राठी तर कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणुन प्रा.किशोर बयस होते,मंचावर उपस्तित सांस्कृतिक प्रमुख श्री.नरसिंग सोळके होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला मंचावरिल मान्यवरांच्या हस्ते माता सरस्वती आणि पृथ्वीगोल यांच्या प्रतिमांचे पुजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्री.प्रा.किशोर बयस यांनी विद्यार्थ्याना मकरसंक्रात या विशिष्ट दिनाचे भौगोलिक दुष्ट्या असणारे महत्त्व विशद करुण पृथ्वीच्या परिवलन परिभ्रमण गतिनुसार दिवस आणि रात्र कसे होतात हे सांगितले तसेच आंतरराष्ट्रीय वार रेषेवरून जागतिक वेळ व वार कसा निश्चित केला जातो हे सांगून आंतरराष्ट्रिय वार रेषेचे जागतिक व्यापार आणि वाहतुकिसाठी असलेले महत्व स्पष्ट केले.तसेच याप्रसंगी अध्यक्षीय भाषणातुन प्र.मुख्याध्यापक श्री.वसंतराव अवचार यांनी शैक्षणिकदुष्ट्या भूगोल विषयाचे महत्व सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन श्री.देवानंद ताजने तर आभार प्रदर्शन श्री.सिद्धार्थ भालेराव यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यालयातील शिक्षक श्री.गजानन पाटिल, श्री.विजय कटयारमोल,नरसिंग सोळके,सौ.मुंदडा मॅडम,सौ.जोशी मॅडम,सौ.भाटी मॅडम यांनी अथक परिश्रम घेतले.
सम्राट टाइम्स न्यूज़.
सिद्धार्थ भालेराव.
 9552978172

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा