मंगळवार, १६ जानेवारी, २०१८

जागेचा मालकी हक्क मिळन्यासाठी कार्ली येथील ग्रामस्थांचे प्रशासनाला निवेदन



कारंजा-तालुक्यातील कार्ली येथील सरकारी ई क्लास जागेचा मालकी हक्क मिळणे बाबत  ग्रामस्थांनी तहसिल कार्यालय येथे बहुसंख्येने निवेदन दिले आहे.सविस्तर वृत्त असे की,कारंजा ता. मौजे कार्ली येथील सरकार ई क्लास व सरकार एफ क्लास या जागेवर अनुसूचित असून कायम रहिवासी असून, वारंवार या जागेचा मालकी  हक्क मिळण्याकरिता ग्रा. प. कार्यालय येथे निवेदन देण्यात आले होते व तेंव्हा काही  ई क्लास  अनुसूचित लाभधारकाना मालकी हक्क मिळाले आहेत , तेंव्हा आम्ही सर्व अनुसूचित असून वारंवार निवेदन देऊन सुद्धा आम्हाला हेतूपुरस्सर पणे , मालकी हक्क दिले गेले नाहीत तेंव्हा आम्ही आलेल्या शासकीय योजनेचा लाभापासून वंचित राहत आहोत. करीता आम्हाला या जागेचा मालकी हक्क देण्यात यावा याकरीता  सचिन पाटील यांच्यासह लक्ष्मण गालफाडे,देवानंद पवार,बाळकृष्ण ढोके,रामदास घनघाव,सिध्दार्थ इंगोले,कांताबाई इंगोले,सदाशिव लांजेवार,श्यामराव गालफाडे,महादेव करडे आदींनी तहसीलदार कारंजा यांना विनंती पर  शेकडोच्या  उपस्थित मध्ये ई क्लास व फ क्लास जागेचा मालकी हक्क देण्यात यावा या करीता लेखी  निवेदन सादर केले.


प्रतिनिधी- दामोदर जोंधळेकर
मो.9922365149
सम्राट टाईम्स न्युज नेटवर्क

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा