रिसोड- दि.१४ वाशिम रिसोड येथील पंकज बगडीया यांची पोलीस बॉईज असोसिएशन च्या रिसोड तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली .जिल्हाध्यक्ष विनोद तायडे यांच्या हस्ते वाशिमकर हॉटेल येथे आयोजित कार्यक्रमात बगडीया यांना नियुक्ती पत्र देण्यात आले
पोलिसांच्या बाजूने लढणारी संघटना पोलीस बॉईज असोसिएशन च्या जिल्ह्या स्तरीय बैठकीचे आयोजन स्थानिक हॉटेल वाशिमकर येथे नुकतेच करण्यात आले होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनोद तायडे यांची उपस्थिती होती
महाराष्ट्रात मजबूत संघटन असलेल्या पोलीस बॉईस असोसिएशन ने पोलिसांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडून न्याय मिळवून दिला आहे .सदर बैठकीत संघटनेची नवीन दिशा ठरविण्यात आली . जिल्हा कार्यकारणी सह वाशिम, मालेगाव,रिसोड, मंगरूळपीर, मानोरा ,कारंजा तालुका अध्यक्षांची निवड करण्यात आली सदर कार्यकारीणी निवड बैठकीला बहुसंख्य पोलीस बॉईज ची उपस्थिती लाभली
सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा