सोमवार, १५ जानेवारी, २०१८

मुख्यमंत्री साहेब मरणाची परवानगी द्या हो युवा शेतकऱ्याचा आर्त टाहो



             पहा व्हीडीओ

वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्या अंतर्गत येणाऱ्या कोळगाव बु येथील युवा शेतकरी विजय पंडितराव शेडगे यांनी कर्ज माफीत शासनाने भेदाभेद केल्याने चक्क मुख्यमंत्री यांना  निवेदनातून आत्महत्त्या करण्याची परवानगी मागितल्याने एकच खळबळ उडाली आहे
कुटुंबातील कोणत्याही सदस्याने आत्महत्त्या केल्यास शासन जबाबदार राहणार असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे तहसीलदासह आमदार अमित झनक यांना निवेदन दिले आहे  निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री ,कृषिमंत्री आणि पालक मंत्र्याना पाठविल्या आहेत. निवेदनात नमूद करण्यात आले  आहे की ,शासनाने छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजने अंतर्गत  फशीत शेतकऱ्यांना दीड लाखा पर्यंत कर्जमाफी देऊन नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना मूर्खांत काढले आहे  नियमित कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांनी उसनेवारी व व्याजाने पैसे घेऊन कर्ज भरले त्यांच्यावर कर्जमाफी देताना  शासनाने अन्याय केला त्यांना 1 ते दीड लाखा पर्यंत कर्जमाफी दयावी
शेतमालाला हमीभाव नाही सोयाबीनला 2700 रुपये ते 2800 रुपये  तर तुरीला 4000 रुपये ते 4500 रुपये भाव मिळाला सांगा मुख्यमंत्री महोदय  शेतकऱ्यांनी जगावे की मरावे असा  सवाल मुख्यमंत्र्याना केला आहे.

महादेव हरणे 
कार्यकारी संपादक  सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क
-- 9922224889

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा