बुधवार, १० जानेवारी, २०१८

सत्यमेव जयते वाॅटर कप स्पर्धेत शेलगाव ग्राम पंचायतचा सहभाग



प्रशिक्षणासाठी ग्रामसभेत झाली पाच लोकांची निवड

मंगरूळपीर दि. 10 
पाणी फांउडेशन व शासनाच्या वतीने मंगरूळपीर तालुक्याची सत्यमेव जयते वाॅटर कप स्पर्धा 3 करीता निवड झाली असून त्या दुष्टीने शेलगाव ग्राम पंचायतच्या वतीने सत्यमेव जयते वाॅटर कप स्पर्धेत शेलगावचा सहभाग व पाच प्रशिक्षणाथ्र्यांच्या निवडी संदर्भात दि. 10 जानेवारी रोजी ग्रासभा पार पडली. या ग्रासभेत सत्यमेव जयते वाॅटर कप स्पर्धेत गाव स्वंयस्फुर्तेने सहभागी होणार असल्याचा ठराव संम्मत करण्यात आला तसेच होणा-या प्रशिक्षणासाठी पाच लोंकाची निवड करण्यात आली.

शेलगाव ग्राम पंचायत येथे झालेल्या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच्या सौ वनमाला गायकवाड, तर प्रमुख अतिथी म्हणुन उपसरपंच शोभाबाई भोयर, सदस्य डिगाबर भोयर, प्रभाकर भोयर, छाया गायकवाड, हेमंत गायकवाड,संजय भोयर, पोलीस पाटील नीता भोयर,  तंटामुक्त अध्यक्ष किशोर भोयर, नाना देवळे यांची उपस्थिती होती. यावेळी या ग्रासभेला पाणी फाउडेशनचे तालुका समन्वयक प्रफुल बानगावकर, देवेंद्र राऊत यांनी माहीती सांगुन प्रशिक्षणासाठी कश्याप्रकारे ग्रामस्थानची निवड करायची या बाबात विडीओ दाखविण्यात आला. यानंतर ग्रामसेवीका इंगोले यांनी पाच गावक-यांची प्रशिक्षणासाठी निवड करून सहभागी असल्याचा भाग 2 फार्म पाणी फांउडेशन तालुका समन्वयाकडे देण्यात आला.  ग्रामसभेला संतोष सुर्व, शाताराम भोयर, जगन्नाथ भोयर, पांडुरंग भोयर, अशोक भोयर, विठलं भोयर, गजाजन भोयर, विजय भोयर, रामेश्वर भोयर, रमेश भोयर, गजानन भोयर, जितेंद्र गायकवाड यांच्यासह गावातील ग्रामस्थाची उपस्थिती होती ग्रासभेचे संचालन ग्रामसेविका इंगोले यांनी केले.

सम्राट टाईम्स न्यूज नेटवर्क 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा