मंगळवार, २ जानेवारी, २०१८

भीमा कोरेगाव हल्ल्याच्या निषेधार्थ रिधोरा येथे रस्ता रोको आंदोलन



भीमा कोरेगाव येथे भीमसैनिकावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ  अकोला हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर  रिधोरा येथे आज रस्ता रोको आंदोलन करण्यात येऊन सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली
भीमा कोरेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आंबेडकर यांच्या हाकेला ओ  देत तमाम आंबेडकरी जनता रस्त्यावर आली .अकोला हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर रिधोरा येथे रिधोरा,सुकांडा, ब्राह्मणवाडा येथील आंबेडकरी महिला, पुरुष कार्यकर्ते रस्त्यावर उतरले राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको करत कार्यकर्त्यानी सरकार विरोधात ओरड घोषणाबाजी केली हल्लेखोरांचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला रस्ता रोको केल्याने वाहतूक ठप्प झाली  यावेळी पोलीस जमादार रमेश जायभाये ,,पोलीस कर्मचारी गजानन टाले यांनी चोख बंदोबस्त ठेवला
सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा