बुधवार, १० जानेवारी, २०१८

जिजाऊ जन्मोत्सवास हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे-भागवत मापारी




मराठा सेवा संघाचे वतीने येत्या १२ जानेवारीला जिजाऊ सृष्टी, मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे आयोजित राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या ४२१ व्या जन्मोत्सव सोहळ्यास मराठा - बहुजनांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वीर भगतसिंह विद्यार्थी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष भागवत मापारी यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

जिजाऊसृष्टीवर दरवर्षी १२ जानेवारीला देशविदेशातून व राज्यभरातून लाखो शिवभक्त जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी येत असतात. या वर्षी जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी मान्यवर येत असून त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज तंजावर
 ( तामिळनाडू ) येथील छत्रपती बाबाजी राजे भोसले, साताराचे खासदार उदयनराजे भोसले, कोल्हापूरचे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले, खासदार नाना पटोले, अमेरिका शाखेचे मराठा सेवा संघ अध्यक्ष स्वप्नील खेडेकर आदी मान्यवर उपस्थित राहणार असून ज्येष्ठ नेते शरद पवार, नारायण राणे आदी मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. मुख्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अॅड.पुरुषोत्तम खेडेकर राहणार असून मराठा सेवा संघाचे नूतन प्रदेशाध्यक्ष इंजी.विजयराव घोगरे, माजी प्रदेशाध्यक्ष कामाजीराव पवार, महासचिव मधुकरराव मेहेकरे, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा डॉ.रेखाताई पाटील, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॅड.मनोज आखरे, पप्पू पाटील भोयर, सुदर्शन तारख,गंगाधर महाराज कुरुंदकर, शिवराज उर्फ रामदास  कैकाडी महाराज, सत्यपाल महाराज, प्रा.मा.म.देशमुख, गंगाधर बनबरे, चंद्रशेखर शिखरे, देवानंद कापसे, अरविंद गावंडे , दिलीपराव देशमुख, छायाताई महाले, सचिन चौधरी,आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमा दरम्यान जिजाऊ राजवाडयात जिजाऊ पूजन, रॅली, पोवाडे गायन, सांस्कृतीक कार्यक्रम, मराठा विधीज्ञ भूषण, मराठा विश्वशाहीर भूषण, मराठा उद्योजक भूषण  पुरस्कार वितरण, सामुहिक विवाह सोहळा, मान्यवरांची मनोगते तथा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान पार पडणार आहे. जिजाऊसृष्टीवर सकाळी ९ वाजतापासून कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमांसाठी मराठा सेवा संघ व विविध कक्ष परिश्रम घेत असून जन्मोत्सव सोहळ्यासाठी मराठा बहुजनांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मापारी यांनी केले आहे.

महेंद्रकुमार महाजन रिसोड प्रतिनिधी 9960292121

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा