वाशिम - समाजात समाज परिवर्तन घडवून आणण्यासाठी या भारत भूमित अनेक महापुरुष,अनेक संत यांनी आपल्या घरादाराचा,परिवाराचा कसलाच विचार न करता त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य हे समाज परिवर्तन घडवून आणण्यासाठी खर्ची घातले. म्हणून तर आज आपण स्वाभीमानाने, सन्मानाने जिवन जगत आहो.याची जाणीव आपल्याला असली पाहिजे.नाहीतर नुसतेच आज गाडगे बाबा यांचा 61 वा स्मृतिदिन आहे.म्हणून अनेक गावांत त्यांच्या नावाने स्वछता अभियान राबवून फोटो काढून त्यांना मर्यादित केले जाते. हे आजच्या समाजातील कुठेतरी थांबले पाहिजे.असे प्रतिपादन नेहरू युवा केंद्र राष्ट्रिय कौर प्रविण पट्टेबहादुर यांनी त्यांना अभिवादन करतांना केले.
पुढे बोलतांना पट्टेबहादुर म्हणाले की, गाडगे बाबा यांनी नुसतीच गावांत स्वछता केली नाही तर त्यांनी समाजात असलेली घाण साफ करुन समाजात वैचारिक क्रांती घडवून आणली. त्यांनी अंधश्रद्धा बुवाबाजी, यावर कडाडून हल्ला करूंन जनतेला या पासुन दूर राहन्याचा मौलिक सल्ला दिला. म्हणून आज आपण त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त नुसतेच स्वछता अभियान राबविले म्हणजे त्यांना अभिवादन ठरणार नाही .तर त्यांनी केलेले कार्य आज नवयुवक तरुण मंडळी यांनी करणे गरजेचे असल्याचे मत देखील प्रविण पट्टेबहादुर यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला आकाश काकडे, प्रदीप पट्टेबहादुर,अजिंक्य पट्टेबहादुर , धम्मपाल पट्टेबहादुर, अनिल गायकवाड, सूरज गायकवाड, ,के.डी.जाधव,वैभव गायकवाड, आशिष खंडारे,स्वप्निल पडघाण,संजय मोरे,गोपाल मापारी,विनायक सरकटे यांच्यासह अनेक जन यावेळी मोठ्या संख्येने या अभिवादन कार्यक्रमाला उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा