स्वयंसेवी संस्थेचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन
वाशीम - गेल्या दोन वर्षापासून जिल्हयात व्यायामशाळा प्रस्ताव, युवा कार्यक्रम, युवा पुरस्कार, युवक कल्याण योजना आदी योजनांना पर्याप्त निधीअभावी ब्रेक लागला असून त्यामुळे जिल्हयातील क्रीडा क्षेत्रात कार्य करणार्या संस्थांवर मोठा अन्याय होत आहे. हा अन्याय दुर करण्याचे मागणीवजा निवेदन स्वामी विवेकानंद संस्थेचे अध्यक्ष अमोल देशपांडे यांनी 30 डिसेंबर रोजी क्रीडामंत्र्यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पाठविल
निवेदनाचा आशय असा की, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. सन 2013 पासून व्यायाम शाळेसंदर्भात मागविण्यात आलेले प्रस्ताव अद्यापही निकाली काढण्यात आले नाही. युवा दिनानिमित्त मागील पंधरा वर्षात स्वयंसेवी संस्थांना कार्यक्रम देण्यात आले नाहीत. सन 2016 च्या एप्रिल महिन्यात मागविण्यात आलेल्या जिल्हा युवा पुरस्काराचे अद्यापही वितरण झाले नाही. जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या ढिसाळ कारभारामुळे निधी नसल्याचे कारण सांगून मागील दोन वर्षापासून युवक कल्याणे प्रस्ताव मागविण्यात आले नाहीत. यामुळे जिल्हयातील क्रीडा व इतर क्षेत्रात भरीव कार्य करणार्या स्वयंसेवी संस्थांवर अन्याय होत आहे. तरी या सर्व मुद्यांवर त्वरीत कार्यवाही करावी अन्यथा स्वयंसेवी संस्था, युवक, युवती मंडळे यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा क्रीडामंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.
सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा