परिसरातील स्वच्छतेबरोबरच मनही स्वच्छ ठेवा - तेजराव वानखडे
वाशीम - परिवर्तन कला महासंघाच्या वतीने स्थानिक महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात नववर्षाचे औचित्य साधून 31 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी कार्यकत्यार्र्ंनी झाडु व खराट्याने परिसरातील संपूर्ण केरकचरा झाडून परिसर स्वच्छ करण्यात आला. तसेच सौदर्यीकरण स्थळाचीही स्वच्छता करण्यात आली. यावेळी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष तेजराव वानखडे आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात बोलताना म्हणाले की, आपण महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महर्षी गाडगे महाराज यांची शिकवण लक्षात ठेवून परिसरातील स्वच्छतेबरोबर आपले मनही स्वच्छ ठेवा. केवळ वरवर स्वच्छताच महत्वाची नसून मनही स्वच्छ असले पाहीजे. कार्यकत्यार्र्ंनी एकमेकांबद्दल प्रेम व आपुलकीची भावना ठेवली पाहीजे. तरच या स्वच्छतेला महत्व राहील. बाह्य स्वच्छतेबरोबरच अंतर्गत स्वच्छताही महत्वाची आहे. आपले घर आपण ज्याप्रमाणे स्वच्छ ठेवतो त्याचप्रमाणे आपल्या परिसराची, आपल्या गावाचीही स्वच्छता ठेवा. तरच जनतेचे आरोग्य सुरक्षीत राहील. याप्रसंगी तरुण क्रांती मंचचे जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी यांनी आपले विचार व्यक्त करताना स्वच्छता ही काळाची गरज असून रोगराईपासून मुक्त होण्याकरीता आपला परिसर नेहमी स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले. पकमचे जिल्हाध्यक्ष तथा रिपाइंचे कार्याध्यक्ष शेषराव मेश्राम म्हणाले की, जिल्हा स्वच्छ ठेवण्याकरीता जनतेने सहकार्य करावे व सतत स्वच्छता अभियान सुरु ठेवावे. कलावंतांनी आपल्या गावामध्ये स्वच्छतेच्या जागृतीकरीता मोहीम राबवावी व संपूर्ण खेडे परिसर सुध्दा स्वच्छ ठेवावा असे आवाहन केले. या अभियानामध्ये शाहीर गोविंदराव इंगोले, शाहीर भिमराव लबडे, शाहीर विश्वनाथ इंगोले, लोडजी भगत, जिजेबा पट्टेबहादूर, समाधान भगत, गायीका विशाखा इंगळे, पकमच्या जिल्हा महिला अध्यक्षा शारदा इंगोले, अरुण इंगळे, सखुबाई खंडारे, पार्वतीबाई पठाडे, कांताबाई इंगळे, लक्ष्मीबाई पट्टेबहादूर, रंजनाबाई गुडदे, रेखाबाई कंकाळ, सुनिता खंडारे, आकाश खंडारे, अमोल गायकवाड, उल्हास इंगोले, दिलीप कांबळे, दिपक भगत, सुरेश पडघाण, सुखदेव सरकटे यांच्यासह मोठ्या संख्येने परिवर्तन कला महासंघाचे कलावंत उपस्थित होते.
सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा