मंगळवार, १९ डिसेंबर, २०१७

चुक महावितरणची असुन आम्हाला आर्थीक भुदंड का ? संतप्त वीज ग्राहकांचा सवाल !




वाढवेल्या ,फॉल्टी वीज बीलामुळे ग्राहकांना नाहक ञास. 
कनिष्ठअभियंता नसल्यामुळे वीज बील दुरुस्थीसाठी माराव्या लागत आहेत मंगरुळपिरला चकरा.

चुक महावितरणची असुन आम्हाला आर्थीक भुदंड का ? संतप्त वीज ग्राहकांचा सवाल !          

मंगरूळपिर -

दि १८डीसेंबर 

शेलुबाजार  येथील व ३३केव्ही वीज उपकेंद्रातील कनिष्ठ अभियंता हे पद मागील ६ महिन्यापासून रिक्त असल्यामुळे अनेक गावातील वीज ग्राहकांना वीजेचे बील हे (फॉल्टी) व पुर्वी भरलेले हे लागुन आल्यामुळे वीज ग्राहक ञस्त झाले असुन बील दुरुस्तकरुन घेण्यासाठी मजुरी पाडुन ११कि .मी .अंतरावरील मंगरुळ पिर या  तालुक्याच्या  ठीकाणी जावुन ४० रुपये आर्थीक भुर्दंड सोसावा लागत आहे.त्यामुळे वीज ग्राहक ञस्त झाले.आहेत अनेक  वीज ग्राहकांना चुकीचे बील आल्यामुळे अनेक अडचणी नीर्माण होत आहेत.
शेलुबाजारं गावातील व परीसरातील अनेक गावातील वीज ग्राहकांना पुर्वी भरलेले वीज बील हे पुन्हा लागुन आले असुन अनेक वीजग्राहकांना फॉल्टी वीजेचे बील आले आहे त्यामुळे वीज ग्राहकांना यांचा खुप ञास सहन करण्याची वेळ आली आहे.याचा ञास सहन करवा लागत आहे मंगरूलपीर येथे जावुन वीजबील कमी करण्याची वेळ जनतेवर आली आहे.त्यामुळे ४०रुपये खर्च करुन मंगरूळ पीर येथे जावुन वीजबील कमी करण्याची वेळ वीज ग्राहकांवर आली आहे.नेहमी नेहमी असाच ञास वीज ग्राहकांना सोसावा लागत असल्यामुळे वीज ग्राहक ञस्त झाले आहेत .शेलुबाजार  येथील व ३३केव्ही वीज उपकेंद्रातील कनिष्ठ अभियंता हे पद लवकरात लवकर भरण्यात यावे जेणे करून ग्राहकाला त्रास होणार नाही व योग्य ती सेवा महावितरण कडून देण्यात येईल अशी मागणी वीज ग्राहका कडून होत आहे.

सम्राट टाईम्स लाईव्ह

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा