कृषी व फलोत्पादन, पणन आणि पाणीपुरवठा व राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी कामरगाव येथे दि. २३/१२/२०१७ सकाळी १० वाजता धनराज उंटवाल यांच्या शेताला भेट दिली. आज रोजी शेतकऱ्याच्या होत असणाऱ्या व्यथा पाहून त्यांचे निवारण करण्याचे आश्वासन दिले . आज पराठीवर बोण्ड अळीचे रोग पसरलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्याचे पराठीचे पीक धोक्यात आलेले आहे. या रोगामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. त्यांना दिलासा देण्याकरिता सदाभाऊ खोत यांचा हा प्रयत्न आहे. सदाभाऊ खोत हे शेतकऱ्यांना मदत करणार अशी अपेक्षा कामरगाव येथील शेतकऱ्याच्या आहेत. या भेटी करीता S.D.P.O शरद जावळे पाटील , सचिन पाटील तहसीलदार साहेब कारंजा लाड , गणेशपुरे मॅडम, राजीव काळे भाजप तालुका अध्यक्ष, रवी भुते प. स. सदस्य , माजी सरपंच साहेबराव तुमसरे, मिसाळ साहेब ग्रामसेवक, आणि समस्त गावकरी हजर होते.
विनोद नंदागवळी
सम्राट टाईम्स लाईव्ह, कामरगाव
मो. ९६७३९५४५१६
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा