बुधवार, १३ डिसेंबर, २०१७

शासनाच्या माध्यमातून बाजार समितीचा विकास करू -- गोपाल पाटील राऊत


मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा शासनाच्या अनेक शेतकरी हिताच्या  योजना असून त्या योजना चा फायदा मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना करुन  देण्यासाठी व बाजार समितीचा सर्वांगीण विकासासाठी  मिळलेल्या पदाचा उपयोग करणार असल्याची प्रतिक्रिया मालेगाव बाजार समितीचे तज्ञ
संचालक गोपाल राऊत यांनी दिली.मालेगाव कृ.ऊ.बा.स.च्या तज्ञ संचालक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार बाजार समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला त्या प्रसंगी ते बोलत होते.बाजार समितीचे सभापती बबनराव चोपडे ह्यांच्या  हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी उपसभापती प्रकाश  अंभोरे , संचालक प्रकाश पाटील कुटे, सुरेश शिंदे , प्रदीप कुटे , डॉ. प्रमोद नवघरे,राजकुमार शिंदे, विजय अंभोरे, विजय आदमने यांच्या सह बाजार समितीचे सचिव कढणे  व कर्मचाऱ्यांची  उपस्तीथी होती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा