रिसोड - तालुक्यातील चिचांबापेन येथील भारत माध्यमिक शाळेत 22 डिसेंबर रोजी दि. आर्य शिक्षण संस्थेचे सचिव अॅड. नकुल देशमुख, स्थानिक शाळा समितीचे अध्यक्ष जगदिशराव सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली महान गणिततज्ञ रामानुजन यांची जयंती राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक गाजनन बानोरे होते तर प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ शिक्षक पि.के. साबळे, टि.के. पतंगे, एन.डी. सरनाईक, प्र.अ. वाठोरे, के.एन. गिरी उपस्थित होते. सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. शाळेतील विद्यार्थी कु. भाविका कंकाळ, कु. निकीता पंडीत यांनी रामानुजन यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. जेष्ठ शिक्षक पी. के. साबळे, टी.के. पतंगे, एन.डी. सरनाईक यांची समयोचित भाषणे संपन्न झाली. राष्ट्रीय गणित दिननिमित्त शाळेत भौमितीक रांगोळी स्पर्धेचे, पाढे, सुत्र पाठांतरचे आयोजन करण्यात आले. या रांगोळी स्पर्धेत प्रथम क्रमांक कु. मयुरी मोरे, कु. जीनत सैय्यद, कु. श्रेया सुरतकर या गटाचा तर व्दितीय कु. निकिता पंडीत, तृतीय कु. आस्मा परवीन पठाण हिचा आला. या कार्यक्रमास शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी बहूसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार शिक्षक टी.के. पतंगे यांनी मानले.
महेंद्र महाजन रिसोड प्रतिनिधी
सम्राट टाइम्स न्यूज
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा